Mrunal Thakur follow on Instagram Dhanush sisters
मुंबई - अजय देवगनचा कॉमेडी चित्रपट सन ऑफ सरदार २ मध्ये मृणाल ठाकुरने राबियाची भूमिका साकारली. आता धनुष आणि मृमाल यांच्या डेटिंगची चर्चा रंगलीय. याबद्दल दोघांकडूनही कोणताही खुलासा वा स्पष्टीकरण आलेले नाही. दरम्यान, आता तिची आणखी एका गोष्टीमुळे चर्चा होतेय, ज्यामुळे असा तर्क लावला जात आहे की, मृणाल आणि धनुष नक्कीच एकमेकांना डेट करत आहेत.
अभिनेत्री मृणाल ठाकुर आणि धनुषचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. व्हायरल व्हिडिओत दोघेजण एकमेकांशी काही तरी बोलताना दिसत होते. याशिवाय, सन ऑफ सरदार २ च्या स्क्रीनिंगवेळीही धनुषने हजेरी लावली होती. त्यामुळे दोन्ही कलाकारांच्या डेटिंगची चर्चा रंगली. आता आणखी एक भर म्हणजे मृणालने धनुषच्या बहिणींना इन्स्टाग्रामवर फॉलो करणं सुरू केलं आहे, असे वृत्त समोर आले आहे.
फॅन्सने नोटिस केलं की, मृणालने धनुषच्या दोन्ही बहिणी डॉ. कार्तिका कृष्णमूर्ती आणि विमला गीता यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करणं सुरू केलं आहे. तर त्या देखील मृणालला फॉलो करतात.
याआधी श्रुती हासन, त्रिशा कृष्णन, अमला पॉल या अभिनेत्रींसोबत धनुषचे नाव जोडले गेले आहे. श्रुती हासन - धनुषने एकत्र अनेक चित्रपटात काम केले आहे. '3' या चित्रपटातील त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. त्रिशा कृष्णन - धनुषने ‘कोडी’ चित्रपटात काम केले होते. सोशल मीडियावरून त्यांच्या अफेअरची चर्चा झाली होती. साऊथ अभिनेत्री अमला पॉल-धनुषने 'रघुवरन बीटेक' चित्रपटात एकत्र अभिनय केला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपट यशस्वी ठरली. नंतर असेदेखील वृत्त आले की, दोघे एकमेकांना डेट करत आहेत.