Sita Ramam 2 | ‘सीता रामम 2’साठी मृणाल-दुलकर पुन्हा एकत्र?  
मनोरंजन

Sita Ramam 2 | ‘सीता रामम 2’साठी मृणाल-दुलकर पुन्हा एकत्र?

पुढारी वृत्तसेवा

मृणाल ठाकूर आणि अभिनेता दुलकर सलमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकताच या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यामुळे ‘सीता रामम 2’ किंवा दोघांच्या एखाद्या नव्या प्रोजेक्टबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

2022 साली प्रदर्शित झालेल्या रोमँटिक ड्रामा ‘सीता रामम’ मध्ये मृणाल आणि दुलकरच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले होते. त्यांच्या केमिस्ट्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळेच या व्हायरल फोटोमुळे चाहत्यांच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. हा फोटो एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत मृणाल ठाकूर आणि दुलकर छत्रीखाली उभे असून, एकमेकांकडे हसत पाहताना दिसत आहेत. फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली की, ही जोडी ‘सीता रामम’च्या सिक्वेलसाठी पुन्हा एकत्र येत आहे का? मात्र, सध्या तरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा पुष्टी करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT