अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या वाढलेल्या वजनाबद्दल खुलासा केला  Instagram
मनोरंजन

Mouni Roy Weight Gain : ३ महिन्यात वाढलं ३० किलो वजन, मौनी रॉयने खाणे-पिणेही सोडले

अक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीचे वाढले ३० किलो वजन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेत्री मौनी रॉयचा फिटनेस पाहून भल्याभल्यांची बोलती बंद होते. टीव्ही ते मोठ्या पडद्यावरील अभिनेत्री मौनी रॉय एक यशस्वी अभिनेत्री मानली जाते. मालिका 'नागिन' ते अक्षय कुमारची हिरोईन बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास वाखाणण्याजोगे आहे. यादरम्यान, तिला अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. एका मुलाखतीत तिने आपल्या आरोग्याविषयी खुलासा केला आहे. ती म्हणाली की, ती ७-८ वर्षापूर्वी ती खूप लाईमलाईटमध्ये राहायची नाही. तेव्हा तिचे वजन केवळ ३ महिन्यात ३० किलो वाढलं होतं.

मौनी रॉय काय म्हणाली?

नागिन मालिकेआधी तिचे वजन ३० किलो वाढले होते. तेव्हा तिला वाटले होते की, आता आयुष्य संपलं आहे. मी इतकं वजन कसे कमी करणार? मी इतकी चिंतेत होते की, मी केवळ ४-६ दिवस केवळ ज्यूस पिऊन राहत होते. माझा मूड नेहमी खराब राहायचा. मग मला वाटले की, जेवणदेखील जेवायला हवं.

ती पुढे म्हणाली की, एकदा मी खूप आजारी पडले होते. तिला L4-L5 स्लिप डिस्क आणि कॅल्शियम स्टोन झाले होते. या कारणामुळे मला तीन महिने बेडवर राहावं लागलं. मी खूप सारी औषधे आणि पेन किलर्स खात होते. त्यामुळे माझे वजन अधिक बिघडले. ३० किलो वजन वाढल्यामुळे मला वाटलं आता आयुष्य संपलं आहे. पुढे ती न्यूट्रिशनिस्ट गेली आणि

मौनी रॉयचा लेटेस्ट फोटोशूट चर्चेत

आता ती एकदम फिट आहे. मौनीने लेटेस्ट फोटोशूट केले असून ते चर्चेत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये तिचे हे फोटो स्टायलिश आहे. त्यामध्ये ती खूप गॉजियस दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT