mouni roy suraj nambiar divorce 
मनोरंजन

mouni roy suraj nambiar divorce : मौनी रॉय हिच्या घटस्फोटाच्या चर्चा ठरल्या खऱ्या!

इन्स्टाग्रामवरुन कॉमन पोस्ट करत मौनी व सुरज नांबियार यांनी आपले मार्ग वेगळे असल्याची दिली माहिती

Namdev Gharal

mouni roy suraj nambiar divorce : नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय व तिचा पती सुरज नांबियार यांच्यातील नाते आता संपुष्टात आले आहे. गेले काही दिवस यांच्यातील दुरावा मिडीयापासून लपला नव्हता. या दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याने त्‍यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. आता मौनी व सूरज यांनी दोघांनी एक इन्स्टावर पोस्ट करत आपले नाते संपले असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या 4 वर्षांपासून सूरु असलेल्या त्‍यांचा संसार अखेर मोडला आहे.

काय म्हटले आहे इन्स्टा पोस्टमध्ये

मौनी रॉय व सुरज नांबियारने पोस्ट करत म्हटले आहे काही की आम्ही अत्‍यंत खेदाने हे सांगतो की मीडियाच्या काही घटकांकडून आमच्या वैयक्तिक आयुष्यात अनावश्यक आणि हस्तक्षेप करणारा हस्तक्षेप केला जात आहे. आम्ही दोघे हे स्पष्ट करू इच्छितो की, आम्ही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून, या गोष्टी खाजगीरीत्या आणि सामंजस्याने हाताळण्यासाठी आम्ही आवश्यक वेळ घेत आहोत.

काल्पनिक गोष्टी व धादांत खोट्या बातम्या पसरवून आमच्या खाजगी आयुष्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, ज्यामध्ये आमच्या नात्याचे कोणतेही वास्तव दिसत नव्हते. बदलत्या वैयक्तिक गोष्टींचे चिंतन केल्यानंतर, आम्ही एकमेकांबद्दल आदर आणि समजूतदारपणा ठेवून स्वतंत्र मार्गांनी पुढे जाण्याचा परस्पर निर्णय घेतला आहे.

सध्याच्या काळात, आम्ही या टप्प्यातून विचारपूर्वक आणि खाजगीरीत्या बाहेर पडण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. येणाऱ्या काळातही आम्ही आमची मैत्री जपण्याचा प्रयत्न करू. मौनी आणि सूरज

अशी पोस्ट करत मौनी रॉयने आपल्यातील नाते संपले असल्याचे जाहीर केले आहे. मौनी आणि सूरज यांनी २०२२ मध्ये लग्न केले. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने हा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून मौनी आणि सूरज यांचे तुटलेले नाते चर्चेचा विषय बनले आहे. सूरजने मौनीची फसवणूक केल्याच्या बातम्या येत होत्या. तथापि, यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता, अभिनेत्रीने अलीकडेच एक निवेदन जारी करून आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा असे आवाहन केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT