Mouni Roy आणि तिचे पती Suraj Nambiar यांच्याबाबत सोशल मीडियावर घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. दोघांनी Instagram वर एकमेकांना unfollow केल्याचे चाहत्यांच्या लक्षात आल्यानंतर या अफवा वेगाने पसरल्या. अखेर मौनी रॉयने यावर प्रतिक्रिया देत लोकांना त्यांच्या नात्याबद्दल खोट्या कथा रचू नयेत आणि त्यांना privacy द्यावी, अशी विनंती केली आहे.
अभिनेत्री मौनी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पती सुरज नांबियार (Suraj Nambiar) सोबतच्या नात्यात दुरावा आल्याच्या आणि घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्या. असे असताना अखेर मौनीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या नात्याबद्दल चुकीच्या चर्चा न करण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मौनी रॉय आणि सुरज यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर अनेक मीडियाने आणि सोशल मीडिया युजर्सनी दोघांच्या नात्याबाबत तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली. काहींनी तर दोघांमध्ये घटस्फोट होणार असल्याचे वृत्तही दिले.
या वाढत्या चर्चांदरम्यान अखेर मौनी रॉयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली. तिने लोकांना स्पेस आणि प्रायव्हेसी देण्याची विनंती केली. तसेच, कोणत्याही अपूर्ण माहितीतून निष्कर्ष काढू नयेत आणि त्यांच्या नात्याबद्दल खोट्या कथा पसरवू नयेत, असेही ती म्हणाली.
या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना 'अनफॉलो' केल्याचे चाहत्यांच्या लक्षात आल्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या चर्चांना उत्तर देताना, मौनीने लोकांना त्यांना एकांत आणि प्रायव्हेसी देण्याची विनंती केली आहे. तसेच, त्यांच्या नात्याबद्दल कोणत्याही खोट्या कथा रचू नयेत किंवा घाईने कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये, असे आवाहन तिने सर्वांना केले आहे.
मौनीने काय लिहिलं?
इन्स्टाग्राम स्टोरीजवर रॉयने लिहिले, “सर्व प्रसारमाध्यमांना नम्रपणे विनंती आहे की खोटे वृत्त प्रकाशित करू नका आणि आम्हाला एकांत आणि मोकळीक द्या. कृपया”. त्यासोबत तिने हात जोडलेला इमोजी शेअर केला.
रिपोर्टनुसार, मौनी रॉय आणि नांबियार यांची पहिली भेट २०१९ मध्ये दुबईत झाली होती, असे सांगितले जाते. या जोडप्याने २७ जानेवारी २०२२ रोजी गोव्यातील पणजी येथे पारंपरिक बंगाली आणि मल्याळी पद्धतीनुसार विवाह केला होता.
कोण आहे सुरज नांबियार?
रिपोर्टनुसार, मूळचा बंगळुरूचा असलेला नांबियार सध्या दुबईत वास्तव्यास आहे; तिथे तो एक व्यावसायिक आणि 'इन्व्हेस्टमेंट बँकर' म्हणून कार्यरत आहे.