Mouni Roy Breaks Silence on sexual orientation  pudhari photo
मनोरंजन

Mouni Roy Breaks Silence|'माझी गर्लफ्रेंड्स सर्वात बेस्ट, मी 'समलिंगी नाही...; टीका करणाऱ्यांना मौनी स्पष्टच बोलली

Mouni Roy Breaks Silence|'माझी गर्लफ्रेंड्स सर्वात बेस्ट, मी Gey...', टीका करणाऱ्यांना मौनी स्पष्टच बोलली

स्वालिया न. शिकलगार

घटस्फोट झाल्यानंतर सेक्सुॲलिटीवर टीकेबद्दल भाष्य करताना अभिनेत्री मौनी रॉयने 'आतापर्यंत ऐकलेल्यांपैकी सर्वात खोट्या अफवा' म्हटले आहे. मौनीने हे स्पष्ट केले की, लोक काय विचार करतात याची तिला पर्वा नाही, तिचे संपूर्ण लक्ष तिच्या करिअरवर आणि मनःशांतीवर आहे.

अभिनेत्री मौनी रॉय तिच्या अभिनय करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. तिच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या बदलांनंतर सोशल मीडियावर तिच्याबाबत विविध प्रकारच्या चर्चा आणि अफवा रंगल्या होत्या. आता याच विषयावर मौनीने पहिल्यांदाच स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे.

अलीकडेच एका यूट्यूब मुलाखतीदरम्यान मौनी रॉयला तिच्याबद्दल पसरलेल्या सर्वात विचित्र किंवा मोठ्या अफवेबाबत विचारण्यात आले. त्यावर अभिनेत्रीने कोणतीही आढेवेढे न घेता उत्तर दिले की, तिच्याबद्दल ती समलिंगी असल्याची अफवा तिने अनेकदा ऐकली आहे. या चर्चांकडे तिने फारसे लक्ष दिले नसल्याचेही तिने सांगितले.

तिला सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांनंतर तिच्या मैत्रिणींबद्दल ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. सूरज नंबियारसोबतचा चार वर्षांचा विवाह संपुष्टात आल्यानंतर, मौनी रॉयने आता तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. तिच्या सेक्सुॲलिटी प्रवृत्तीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना आणि मैत्रिणींसोबतचे फोटो पोस्ट केल्याबद्दल तिला ट्रोल करणाऱ्यांना तिने अशाप्रकारे प्रत्युत्तर दिले की सर्वांची बोलती बंद झालीय.

मौनी रॉयबद्दल सतत अफवा पसरल्या

मुलाखतीत जेव्हा 'नागिन' फेम अभिनेत्रीला विचारण्यात आले की, तिने स्वतःबद्दल ऐकलेली सर्वात मोठी अफवा कोणती आहे, तेव्हा तिने न डगमगता उत्तर दिले, "मी ऐकले आहे की मी समलैंगिक (Gey) आहे." यानंतर मौनीने आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दलही मनमोकळेपणाने भाष्य केले. वैयक्तिक आयुष्यातील आव्हानात्मक प्रसंगांमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींनी तिला मोठा आधार दिल्याचे तिने नमूद केले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच प्रत्येक कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद मिळाल्याचे अभिनेत्रीने सांगितले.

विशेषतः तिच्या मैत्रिणींबद्दल बोलताना मौनी भावूक झाली. ती म्हणाली की, चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात तिच्या मैत्रिणी नेहमी तिच्या सोबत उभ्या राहिल्या. आयुष्यात अशा विश्वासू आणि प्रोत्साहन देणाऱ्या महिला मित्र असणे खूप महत्त्वाचे असते, जे नेहमी तुम्हाला पाठिंबा देतात. ''माझी गर्लफ्रेंड्स सर्वात बेस्ट आहे. मी 'गे' नाहीये, असेही तिने स्पष्ट केले."

दरम्यान, मौनी आणि सूरज नंबियार यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले गेले होते. काही चर्चांमध्ये इतर व्यक्तींची नावेही जोडली गेली होती. मात्र त्या वेळी सूरजने सार्वजनिकरित्या स्पष्ट केले होते की, त्यांच्या आयुष्यातील निर्णय हा परस्पर संमतीने घेण्यात आला असून त्यामागे कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा संबंध नाही.

मौनी रॉयने या मुलाखतीतून अफवांपेक्षा वास्तवाला महत्त्व देण्याचा संदेश दिला. तसेच आयुष्यातील कठीण प्रसंगांमध्ये कुटुंब आणि मित्रांचा आधार किती महत्त्वाचा असतो, हेही तिने सांगितले. मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांचे लग्न २०२२ मध्ये झाले होते. ४ वर्षांनंतर हे जोडपे एकमेकांपासून वेगळे झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT