पुढारी ऑनलाईन डेस्क - हिरामंडी : द डायमंड बाजार ही 2024 ची सर्वाधिक लोकप्रिय भारतीय वेब सीरीज आहे. जगभरातील IMDb च्या ग्राहकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे हे निर्धारित झाले आहे. IMDb ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या 10 भारतीय मूव्हीज व 10 वेब सीरीजची यादी घोषित केली आहे. IMDb च्या वर्षाच्या शेवटी येणाऱ्या यादीचे निर्धारण जगभरामध्ये दर महिन्याला काय बघावे हे शोधण्यासाठी IMDb वर येणाऱ्या 25 कोटींहून अधिक दर्शकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार केले जाते.
कल्की 2898-एडी ह्या 2024 च्या क्र. 1 स्थानावरील चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन ह्यांनी म्हंटले, “IMDb च्या 2024 च्या सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये कल्की 2898-एडी पहिल्या स्थानी आल्याचे बघताना अतिशय आनंद होतो आहे. IMDb आणि हा प्रवास इतका रोमांचक करणा-या सर्व चाहत्यांना मन:पूर्वक धन्यवाद!”
कल्की 2898-एडी
स्त्री 2: सरकटे का आतंक
महाराजा
शैतान
फायटर
मंजुमेल बॉयज
भूल भुलैया 3
किल
सिंघम अगेन
लापता लेडीज
हिरामंडी: द डायमंड बाजार
मिर्झापूर
पंचायत
ग्यारह ग्यारह
सिटाडेल: हनी बनी
मामला लीगल है
ताजा खबर
मर्डर इन माहिम
शेखर होम
द ग्रेट इंडियन कपिल शो
2024 च्या IMDb च्या सर्वांत लोकप्रिय भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये सात हिंदी टायटल्स आहेत व त्यानंतर तेलुगू (कल्की 2898-एडी), तमिल (महाराजा) आणि मल्यालम (मंजुमेल बॉयज) अशी प्रत्येकी एक टायटल्स आहेत.
तीन हाय प्रोफाईल सीक्वेल्स—स्त्री 2 : सरकटे का आतंक, भूल भुलैया 3, आणि सिंघम अगेन— द्वारे प्रस्थापित फ्रँचायजीसाठी श्रोत्यांची असलेली आवड अधोरेखित होते. दीपिका पदुकोनने या यादीमधील तीन चित्रपटांमध्ये प्रमुख भुमिका केली आहे:फायटर, कल्की 2898-एडी आणि सिंघम अगेन. तिला अलीकडेच 2024 च्या IMDb सर्वांत लोकप्रिय भारतीय कलाकार यादीमध्येही क्र. 2 चे स्थान मिळाले आहे.
लापता लेडीज (क्र. 10) ही पुढील वर्षाच्या सुरूवातीला होणा-या 97 व्या एकेडमिक पुरस्कारांसाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म प्रकारामध्ये भारताची अधिकृत प्रवेशिका आहे. राघव जुयल असा एकमेव कलाकार आहे ज्याच्या किल व ग्यारह ग्यारह मधील भुमिका सर्वांत लोकप्रिय चित्रपट व वेब सीरीज ह्या दोन्ही यादीमध्ये आहेत. द ग्रेट इंडियन कपिल शो ही IMDb च्या वर्षाच्या शेवटी येणाऱ्या यादीमधील नॉन- फिक्शन प्रकारातील पहिली सीरीज आहे.