नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
जगातील सर्वात सुंदर १९ वर्षीय तरुणी मॉडल येल शेल्बियाने (Yael Shelbia) टीसी कॅडलरच्या वार्षिक यादीत १०० हून अधिक सुंदर चेहऱ्यांमध्ये पहिले स्थान मिळवले. ती इन्स्टाग्रामवर १० लाखांहून अधिक फॉलोअर्ससोबत येल आपल्या ड्रीम लाईफस्टाईलमुळे चर्चेत राहते. या शानदार लाईफस्टाईलमुळे तिला ऑनलाईन तिरस्काराचा सामनादेखील करावा लागतो. आता ती ३६ वर्षाच्या अब्जाधीशला डेट करतेय.
येलचा जन्म इस्त्रायलच्या एका छोट्या शहरात यहूदी कुटुंबात झाला होता. तिने वयाच्या १६ व्या वर्षांपासून मॉडलिंग सुरू केले होते. एका स्थानिक फोटोग्राफरने तिचे इन्स्टाग्रामवरील फोटोना नोटीस केलं होतं आणि एक फोटोशूटमध्ये भाग घेण्यासाठी म्हटलं होतं. येलचे मॉडलिंग करिअर सुरू झालं. येलने इस्त्राएलच्या एअरफोर्ससोबत मिलिट्री सर्व्हीसदेखील केले आहे.
येल सध्या ३६ वर्षीय अब्जाधीश ब्रँडन कोर्फला डेट करत आहे. ब्रँडन अमेरिकेचे अब्जाधीश बिजनेसमॅन सम्नर रेडस्टोनचे नातू आहे. येलने किम कार्दशिया आणि काइली जेनरसारख्या सेलेब्सचे स्किन रेंज प्रोडक्ट्ससाठी मॉडलिंगदेखील केले आहे. तिने सुपरस्टार फुटबॉलर लियोनल मेसीसोबतदेखील काम केले आहे.
एका वेबसाईटशी बोलताना येलने म्हटलंय की, तिला आपल्या लुक्सवरून खूप ट्रोल व्हावं लागतं. मला लोकांकडून खूप सारं प्रेम आणि समर्थन मिळतं. मला अनेक मेसेजदेखील येतात. हे तिरस्कार करणारे मेसेज असतात. परंतु, मी याकडे फारसे लक्ष देत नाही.
२०१७ मध्ये येलचे स्थान या यादीत १४ वं होतं. तर २०१८ मध्ये ती तिसऱ्या स्थानी पोहोचली होती. तर २०१९ मध्ये ती दुसऱ्या स्थानी पोहोचली होती. या ॲवॉर्ड्सचे फाउंडर ब्रिटिश फिल्म क्रिटिक टीसी कॅडलर आहेत. या यादीत मॅरियन कोटिलॅर्ड आणि जोर्डन डन यासारख्या सेलेब्सदेखील पहिले स्थान मिळवले आहे.