भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते आणि आपल्या नवनवीन लूकने चाहत्यांची मनं जिंकत असते. नुकतेच तिने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा बिकिनीतील हॉट लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. वयाच्या 42 व्या वर्षीही मोनालिसाने आपल्या फिटनेस आणि स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये मोनालिसा निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.
निळ्याशार पाण्याच्या कडेला बसून तिने दिलेल्या पोज तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत. तिचा हा कातिलाना अंदाज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, चाहते तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. फक्त बिकिनीच नाही, तर यानंतर मोनालिसाने रिप्ड जीन्स आणि टॉपमधील काही स्टायलिश फोटोही शेअर केले आहेत. यावरून तिचा फॅशन सेन्स किती जबरदस्त आहे, याचा अंदाज येतो. मोनालिसाने भोजपुरी चित्रपटांव्यतिरिक्त अनेक टीव्ही मालिका आणि ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्येही काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटस्चा वर्षाव करत असून, तिचा ग्लॅमरस अंदाज पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.