actor Mohanlal
ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मोहनलाल. (Image source- Instagram/mohanlal)
मनोरंजन

'मॉलिवूड' लैंगिक शोषण प्रकरणी मोहनलाल यांनी सोडलं मौन, म्‍हणाले...

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लैंगिक शोषण आरोपांमुळे सध्‍या मल्याळम फिल्म इंडस्ट्री (मॉलिवूड) हादरली आहे. या सर्व प्रकारामुळे ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मोहनलाल ( Mohanlal) यांनी असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट (AMMA) संघटनेच्‍या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर आता प्रथमच त्‍यांनी या प्रकरणी मौन सोडले आहे.

मल्याळम फिल्म इंडस्ट्री नष्ट करू नका

मोहनलाल म्‍हणाले की, हेमा समितीच्या अहवालाचे आम्ही स्वागत करतो. तो अहवाल जाहीर करणे हा सरकारचा योग्य निर्णय होता. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही सर्व लक्ष मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनवर केंद्रित करू नका. सध्या तपास सुरू आहे. कृपया मल्याळम फिल्म इंडस्ट्री नष्ट करू नका. हे प्रश्न प्रत्येकाला विचारता येत नाहीत. हा अतिशय मेहनतीचा उद्योग आहे. यासाठी प्रत्येकाला दोषी धरता येणार नाही, जे जबाबदार असतील त्यांना शिक्षा होईल.

हेमा समितीचा अहवाल वाचला नाही

'ज्युनियर कलाकारांच्या समस्यांकडेही लक्ष दिले जात आहे. आम्ही तपास प्रक्रियेत सहकार्य करू. आम्ही फक्त गोष्टी योग्य करण्यासाठी येथे आहोत. मला अशा कोणत्याही अशा प्रकारच्‍या प्रभावशाली गटाची माहिती नाही. मी त्याचा भाग नाही. हेमा समितीचा अहवाल मी वाचलेला नाही, असेही त्‍यांनी नमूद केले. जर चुकीच्या लोकांविरुद्ध पुरावे असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्‍यांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT