Hasin Jahan and daughter Arshi FIR in Birbhum
क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जंहा आता एका नव्या वादात सापडली आहे. पण आता घडलेली घटना शमीशी निगडीत नाहीये. हसीन जहा आणि तिची मुलगी अर्शी या दोघींवर गुन्हा दाखल झाला आहे. हसीन जहाचे शेजाऱ्यांसोबत भांडणे आणि मारामारीची घटना समोर आल्यानंतर ही तक्रार दाखल झाली आहे. अर्शी ही हसीन जहा हिच्या पहिल्या लग्नापासून झालेली मुलगी आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील वीरभूम येथील असल्याचे सांगितले जात आहे. याठिकाणी हसीन जहा आपली छोटी मुलगी आयरासोबत राहते आहे
एका व्हायरल विडिओमध्ये हसीन जहा वाद घालताना दिसते आहे. एका जमीनीशी निगडीत प्रकरणाबाबत ती हा वाद घालते आहे. ही जमीन तिची मुलगी अर्शीच्या नावावर आहे. याठिकाणी काही बांधकाम तिने सुरू केले होते. पण हे करताच शेजऱ्यांशी तिचे वादविवाद वाढले. शेजारी रहात असलेल्या डालीया खातूनहिने या बांधकामाला विरोध केला. यामुळे वादाला चांगलेच तोंड फुटले आहे. हा वाद अगदी हाणामारीवर गेल्याचेही समोर आले.
या व्हीडियोतील प्रकार पाहून पोलिसांनी हसीन जहा आणि तिच्यासह मुलगी अर्शीवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये हत्येचा प्रयत्न याशिवाय अनेक कलमे दिसत आहेत. 126(2), 115(2), 117(2), 109, 351(3) आणि 3(5 ) ही ही कलम या हसीन जहा आणि तिच्या मुलीवर लागले आहेत. पीडित महिलेला गंभीर मारहाणही यावेळी मायलेकीनी केली आहे. केवळ बांधकामाला विरोध केला म्हणून हसीन जहाने गंभीर मारहाण केल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हणले आहे.
यापूर्वीही हसीन जहा तिच्या बेताल विधानामुळे चर्चेत आहे. तसेच पती क्रिकेटर मोहम्मद शमीविरोधात तिचा कोर्टात लढाही सुरू आहे. कोर्टाने शमीला आदेश दिला आहे की पत्नीला 4 लाख रुपये महिन्याला भत्ता दिला जावा. यात 1.5 लाख हसीन जहाला तर 2.5 लाख मुलीला दिले जावे असे कोर्टाचे निर्देश आहेत. 2023 मध्ये ती कोर्टात अपील केल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला होता. यापूर्वी हसीन जहाला 50,000 तर मुलीला 80,000 देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.
हसीन जहा आणि क्रिकेटर मोहम्मद शमीचे लग्न झाल्यानंतर 45 वर्षीय हसीन जहाने शमी आणि त्याच्या घरच्यांवर मारहाण आणि मानसिक त्रासाचे आरोप केले होते.
यानंतर अनेक गंभीर आरोप करत ती शमीपासून वेगळी झाली आहे
लग्नापूर्वी मॉडेलिंग करत असल्याचा दावा हसीन जहाने कोर्टात केला होता
शमीने नोकरी सोडायला लावल्याचेही तिने यावेळी सांगितले
आपल्या सोशल मीडिया पोस्टवरुन तिने अनेकदा पाटीवर निशाणा साधला होता
तसेच तिने शमीने वय लपवल्याचा आरोप करत फसवणूक केल्याचे म्हणले होते