दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते हिंदी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्युक यांचे निधन झाले आहे. निधनावेळी त्या अमेरिकेत होत्या. अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे.
हेलेना यांनी तब्बेत बरी नसल्याचे सोशल मीडियावर शेअर केले होते. करियरच्या सुरुवातीला मिथुन यांनी हेलेना यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यावेळी त्या फक्त 21 वर्षांच्या होत्या. मिथुन हे यश मिळवण्यासाठी त्यावेळी संघर्ष करत होते. हेलेना यांना ते वेळ देऊ शकत नव्हते. यावरून या दोघांचेही खटके उडत होते. याशिवाय मिथुन हे इतर भावंडांसोबत रहात असल्याने सर्वांसोबत एकत्र राहणं हेलेना यांना रुचेना. याचा परिणाम म्हणून लग्नानंतर चारच महिन्यात या जोडीचा घटस्फोट झाला.
हेलेना यांनी अमिताभ यांच्या 'मर्द' सिनेमात काम केलं होतं.