मनोरंजन

Harnaaz Sandhu : ‘तू स्वत:ला सिध्द केलंस, पूर्वीपेक्षा खूपच स्ट्रॉन्ग’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

मिस युनिव्हर्स हरनाझ संधूने (Harnaaz Sandhu) नवा फोटो पोस्ट केल्याने तिची चर्चा होताना दिसतेय. हरनाजचा नवा लूकवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. याशिवाय, तिला पाठिंबा देखील देत आहेत. पाठिंबा देण्याचं कारण म्हणजे हरनाझने आपला एक फोटो शेअर करत त्या फोटोला खूप सुंदर कॅप्शन दिलीय. तिने म्हटलंय- stronger than before. @missuniverse. (Harnaaz Sandhu)

harnaaz sandhu

हरनाझ संधूने स्नीकर्समध्ये नवीन फोटोशूट केला आहे. या फोटोला तिने कॅप्शन लिहिलीय- 'पूर्वीपेक्षा मजबूत'. आकर्षक पॉवरसूट आणि स्नीकर्स घातलेला हरनाझ खूप आत्मविश्वासाने पोझ दिलेली दिसते.

harnaaz sandhu

तिची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना प्रभावित केले आहे. तिने लिहिले, "पूर्वीपेक्षा अधिक मजबूत." ब्यूटी क्वीनने खास उन्हाळ्यासाठी पॉवरसूट निवडलाय. फिकट रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसतेय. या फफोटटोवर चाहते कमेंट्स करत आहेत. तू स्वत:ला आदी सिध्द केलं आहेस, खूप स्ट्राॉन्ग आहेस, तुला खूप शुभेच्छा अशा प्रकारच्या कमेंट्स दिल्या जात आहेत.

harnaaz sandhu

वाढलेल्या वजनाची चर्चा आणि ट्रोलिंगचा सामना

२६ मार्च रोजी लॅक्मे फॅशन शो वीकचा एक भाग म्हणून हरजनने रॅम्प वॉक केला होता. पण, बदललेली मिस युनिव्हर्स हरनाझने रॅम्पवर पाऊल ठेवताच तिच्या वजनाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या होत्या. हरनाझ फॅशन डिझायनर शिवन आणि नरेश यांची शोस्टॉपर होती. स्वत:ला प्रेझेंट करताना लोक तिच्याकडे पाहू लागले होते. सोशल मीडियावरही या फॅशन शोमधील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊ लागले होता. तिला पाहून लोक हैराण झाले होते.

harnaaz sandhu

दरम्यान, तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. वाढलेल्या वजनामुळे ती ट्रोल झाली. तिच्या वाढलेल्या वजनामुळे लोक फॅट, फॅट मिस युनिव्हर्स आणि प्लस साईज मॉडेल असेही कमेंट्स देत होते.

harnaaz sandhu

हरनाझने दिले होते सडेतोड उत्तर

आपण जाडजुड का दिसत आहोत, यावर काही लोकांनी तिला ट्रोल केले. यावर ती म्हणाली की- मी माझ्या शरीराचा आदर करते. मला ट्रोलिंग करायला हरकत नाही. मला ग्लूटेनची ॲलर्जी आहे हे लोकांना माहिती नाही. या ग्लुटेन ॲलर्जीमुळे वजन खूप वाढले आहे. चेहराही खूप जाड झाला आहे.

harnaaz sandhu

हरनाझ ॲलर्जीमुळे वाढलेल्या वजनाने त्रस्त आहे. या आजाराने त्रस्त असलेल्या हरनाझला आतड्यांसंबंधी आजार आहे. या आजारामुळे शरीरात ग्लूटेनचे पचन होऊ शकत नाही, त्यामुळे वजन वाढू लागते. या आजाराने त्रस्त लोकांना अन्न, जीवनसत्त्वे, खनिजे शोषून घेण्यास त्रास होतो. त्यामुळे त्यांच्या शरीरात त्वचेखालील थरात चरबी जमा होऊ लागते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT