Mirzapur the movie song out  Pudhari photo
मनोरंजन

Mirzapur the movie|'मिर्झापूर: द मूव्ही'मधील 'दो नंबरी' गाणे प्रदर्शित; हरियाणवी गायक ढांडा न्योलीवालाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Mirzapur the movie | 'मिर्झापूर: द मूव्ही'मधील 'दो नंबरी' गाणे प्रदर्शित; ढांडा न्योलीवालाचा बॉलिवूडमध्ये दमदार प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

यंदाच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या 'मिर्झापूर: द मूव्ही'च्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटातील पहिले गाणे 'दो नंबरी' प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे गायक आणि रॅपर ढांडा न्योलीवाला यांनी लिहिले आहे. तसेच संगीतबद्धही केले आहेत. हरियाणाच्या या गायकाने आपला आवाज देखील केले आहे. विशेष म्हणजे, या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

गाण्यात काय आहे खास?

सुमारे दोन मिनिटांच्या या गाण्यात ढांडा न्योलीवाला यांचा स्टायलिश आणि दमदार अंदाज पाहायला मिळतो. गाण्यात आलिशान गाड्या, बंदुका आणि खासगी विमानांची झलक दाखवण्यात आली आहे. काही दृश्यांमध्ये ते परदेशी लोकेशनवर दिसतात, तर काही ठिकाणी त्यांचा देसी स्वॅगही दिसतो.

पुन्हा भेटणार 'मिर्झापूर'चे हे दिग्गज

'मिर्झापूर: द मूव्ही'मधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा पहिल्या सीझनच्या विश्वात नेण्यात येणार आहे. मोठ्या पडद्यावर प्रथमच गुड्डू पंडित (अली फजल), मुन्ना भैया (दिव्येंदू शर्मा) आणि कालीन भैया (पंकज त्रिपाठी) ही लोकप्रिय पात्रे एकत्र दिसणार आहेत.

दमदार स्टारकास्ट

चित्रपटात जितेंद्र कुमार, रवी किशन, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुगल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिलगांवकर, हर्षिता शेखर गौर, श्वेता त्रिपाठी, सोनल एस. चौहान, अनंगशा बिस्वास, शाजी चौधरी, सतेंद्र सोनी, कुलभूषण खरबंदा आणि सुशांत सिंह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपट कधी रिलीज होणार?

या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले असून कथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी हे सहनिर्माते आहेत.'मिर्झापूर: द मूव्ही' ४ सप्टेंबर, २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT