Mirzapur: The Movie Pudhari photo
मनोरंजन

Mirzapur: The Movie|आक्षेपार्ह शब्दांपासून इंटिमेट सीन्सपर्यंत; ‘मिर्झापूर: द मुव्ही’मध्ये 'सेन्सॉर'ने काय काय कापलं?

Mirzapur: The Movie|आक्षेपार्ह शब्दांपासून इंटिमेट सीन्सपर्यंत; ‘मिर्झापूर: द मुव्ही’मध्ये 'सेन्सॉर'ने काय काय कापलं?

पुढारी वृत्तसेवा

‘मिर्झापूर’च्या चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा ‘मिर्झापूर: द मुव्ही’ लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. मात्र, चित्रपट थिएटरमध्ये दाखल होण्याआधीच तो सेन्सॉर बोर्डामुळे चर्चेत आला आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) चित्रपटाला ‘A’ म्हणजेच केवळ प्रौढांसाठी प्रमाणपत्र दिलं असलं, तरी प्रमाणपत्र देण्यापूर्वी निर्मात्यांना काही बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

३५ सेकंदांचे इंटिमेट सीन्स केले कमी?

एका रिपोर्टनुसार, सीबीएफसीने चित्रपटातील दोन ठिकाणी असलेल्या इंटिमेट सीन्समध्ये बदल करण्याचे निर्देश दिले. या दृश्यांची एकूण लांबी जवळपास ३५ सेकंदांनी कमी करण्यात आली आहे. पहिल्या भागात आणि मध्यंतरानंतर अशा दोन दृश्यांमध्ये आवश्यक व्हिज्युअल आणि ऑडिओ एडिट करण्यात आलं.

अपशब्दांवरही सेन्सॉरची कात्री?

मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटातील चार ठिकाणी असलेले आक्षेपार्ह किंवा अपमानास्पद शब्द काढून टाकण्यात आले आहेत. याशिवाय आणखी सहा ठिकाणी असलेल्या आक्षेपार्ह शब्दांच्या जागी पर्यायी शब्द वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या. ‘गले से लग जा’ या संवादातही बदल करण्यात आला आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात एका शब्दाच्या जागी ‘कमर’ हा शब्द वापरण्यास सांगण्यात आलं. तर मध्यंतरानंतरच्या भागातील ‘लुंथ’ या शब्दातही बदल करण्याचे निर्देश देण्यात आले. या शब्दाचा संदर्भ आक्षेपार्ह असल्याचं सांगितलं जात आहे.

चित्रपटाला ‘A’ प्रमाणपत्र

निर्मात्यांनी CBFC च्या सूचनांनुसार आवश्यक बदल केल्यानंतर चित्रपटाला ‘A’ प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. सेन्सॉर प्रमाणपत्रानुसार चित्रपटाची अंतिम लांबी १९७.१९ मिनिटे आहे. म्हणजेच ‘मिर्झापूर: द मुव्ही’चा रनटाइम तब्बल ३ तास १७ मिनिटे १९ सेकंद इतका आहे.

‘मिर्झापूर’चा थरार आता मोठ्या पडद्यावर

‘मिर्झापूर: द मुव्ही’मध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारी विश्व, सत्ता आणि संघर्षाचा थरार पाहायला मिळणार आहे. चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू, जितेंद्र कुमार, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, श्रिया पिळगावकर आणि श्वेता त्रिपाठी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. रवी किशन यांचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. याशिवाय सोनल चौहान, हर्षिता शेखर गौर, अनंगशा बिस्वास आणि शाजी चौधरी हे कलाकारही या चित्रपटाचा भाग आहेत.

या दिवशी थिएटरमध्ये होणार रिलीज

ओटीटीवरील ‘मिर्झापूर’च्या लोकप्रियतेनंतर या विश्वाची मोठ्या पडद्यावरची कथा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आता सेन्सॉर बोर्डाच्या बदलांनंतर तयार झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरतो आणि बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT