मनोरंजन

Mirzapur 3 : घायल शेर लौट आया है! मिर्झापूर 3 ‘या’ दिवशी होणार रिलीज

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mirzapur 3 : लोकप्रिय क्राइम-ड्रामा वेब सीरिज 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सीझनची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना मंगळवारी (दि.11) आज दुहेरी सरप्राईज मिळाले. खरं तर, निर्मात्यांनी या मालिकेची रिलीज डेट जाहीर केली असतानाच 'मिर्झापूर 3' ची पहिली झलकही समोर आली आहे. या वेब सीरिजचा आज टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये बाबू जी उर्फ सत्यानंद त्रिपाठी यांचा आवाज ऐकू येतो

मिर्झापूर ही भारतातील सर्वात लोकप्रिय वेब सिरीज आहे. या सिरीजचे आतापर्यंत दोन सीझन प्रदर्शित झाले असून सुपरडुपर दोन्ही हिट झाले आहेत. अशातच वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. पंकज त्रिपाठी आणि अली फजल स्टारर सिरीज 'मिर्झापूर' त्याच्या धमाकेदार ॲक्शन, ड्रामा आणि थ्रीलरसाठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. आता हा तिसरा सीझन 5 जुलै रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. त्याचे एकूण 10 एपिसोड्स असतील. या सिरीजमध्ये कालीन भैयासोबत गुड्डू भैय्या, गोलू गुप्ता, बीना त्रिपाठी आणि सत्यानंद त्रिपाठी पुन्हा एकदा कमबॅक करत आहेत. याशिवाय काही नवीन पात्रेही पाहायला मिळतील. चाहत्यांनी काउंटडाउन सुरू केले आहे. (Mirzapur 3)

'मिर्झापूर' सीझन 3′ च्या टीझरसोबतच शोचे नवीन पोस्टरही समोर आले आहे. या पोस्टरमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, अंजुम शर्मा, विजय वर्मा आणि ईशा तलवार दिसत आहे. मिर्झापूरचे सिंहासन आगीत जळताना दिसते. गोलू गुप्ताचा (श्वेता त्रिपाठी) लूकही पूर्णपणे बदलला आहे. या सिरीजमध्ये नवा ट्वीस्ट पाहायला मिळेल हे या पोस्टरवरून स्पष्ट होत आहे. (Mirzapur 3)

SCROLL FOR NEXT