पुढारी ऑनलाईन डेस्क - सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. तर सोशल मीडियामुळे अनेक लोक प्रसिद्ध देखील झाल्याचे समोर आले आहे. (Minahil Malik) सध्या सोशल मीडियावर एक मिनाहिल मलिक नावाच्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिचा एक प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मिनाहिल सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. लोक तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. ती तरुणी कोण आहे, जाणून घेऊया तिच्याबद्दल... (Minahil Malik)
मिनाहिल मलिक एक पाकिस्तान टिकटॉक स्टार आहे. तिचा एक प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाल्याने तिची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मिनाहिलने मौन सोडले आहे आमि सांगितलं की, या व्हिडिओमागे कोणतं सत्य आहे. पाकिस्तानी टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक व्हिडिओमध्ये एका तरुणासोबत दिसत आहे, असे दिसते आहे.
व्हिडिओमध्ये दोघांचे प्रायव्हेट क्षण दिसताहेत. मिनाहिल मलिक सोशल मीडियावर ट्रेंड होत असतानाच ट्रोलदेखील होत आहे. आता मिनाहिल मलिकने व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर तिने आता मौन सोडले असून व्हायरल व्हिडिओमागील सत्य सांग्तलं आहे. शिवाय तिने पोलिस ठाण्यात एफआयआरदेखील दाखल केली आहे.
मिनाहिल मलिकने एक व्हिडिओ शेअर करत म्हटले, '...मी मिनाहिल मलिक आहे. आज मला त्या व्हायरल व्हिडिओ विषयी बोलायचे आहे, जो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पूर्णपणे नकली आहे. मी त्या व्यक्तीविरोधात आधीच एफआयआर दाखल केले आहे आणि त्याला लवकरच अटक केली जाईल'. तिने हे देखील सांगितले की, या घटनेनंतर तिच्या परिवाराल खूप संकटातून सामोरं जावं लागत आहे. आणि ते तणावात आहेत.
मिनाहिलने पुढे म्हटलं, 'अशा लोकांना कुणाच्याही इज्जतीचे काय वाटत नाही.' मिनाहिलने या कठीण समयी लोकांना मदतीसाठी आवाहन केले आहे.
मिनाहिल मलिक एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि पाकिस्तानी टिकटॉक स्टार आहे. तिचे फॅन फॉलोईंगदेखील अधिक आहे. मिनाहिल आपल्या टिकटॉक व्हिडिओसाठी पाकिस्तानमध्ये खूप फेमस आहे. आणि सोशल मीडियावर अनेक लोक तिला फॉलो करतात.