मनोरंजन

मिलिंद सोमणच्या फिटनेसचं रहस्य काय?

Pudhari News

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सुपरमॉडल, अभिनेता मिलिंद सोमणचा ४ नोव्‍हेंबरला ५५ वा वाढदिवस आहे. बॉलिवूड, टेलिव्हिजन आणि मॉडलिंग जगतात आपली वेगळी ओळख बनवणारा मिलिंद सोमन फिटनेस फ्रिकदेखील आहे. नेहमी चर्चेत राहणारा मिलिंद सर्वांचा रोल मॉडल आहे. त्याची गणना आजदेखील देशभरातील प्रसिध्द मॉडेल्समध्ये केली जाते. या वयात तो जेव्हा रॅम्वर उतरतो तेव्हा यंग मॉडल्स त्याच्यासमोर मागे पडतात. मिलिंदच्‍या लुक्स, पर्सनॅलिटीबरोबरच चर्चा झाली ती, त्‍याच्‍या दुसर्‍या विवाहाची. तुम्‍हाला मिलिंद सोमण याच्‍या आयुष्‍यातील 'या' खास गोष्‍टी वाचायला नक्‍कीच आवडतील! 

मिलिंदचा जन्म ४ नोव्‍हेंर १९६५ रोजी स्कॉटलंड-ग्लासगोमध्‍ये झाला. मिलिंदची सुपर मॉडल म्‍हणून भारतात ओळख निर्माण झाली. इंजिनियरिंगचं शिक्षण घेणार्‍या मिलिंदने मॉडलिंगमध्‍ये करिअर केलं. १९८८ पासून त्‍याने मॉडलिंगला सुरुवात केली. आजदेखील मिलिंद रॅम्‍पवर आल्‍यानंतर भले भले मॉडल्‍स त्‍याच्‍यासमोर मागे पडतात.  

इंडस्ट्रीतला पहिला सुपरमॉडल म्‍हणून मिलिंदला ओळखले जाऊ लागले होते. तो पहिल्‍यांदा गायिका अलीशा चिनॉयसोबत एका म्युझिक व्‍हिडिओमध्‍ये दिसला. 'मेड इन इंडिया' हा म्‍युझिक व्‍हिडिओ चांगला गाजला. मिलिंद 'बाजीराव मस्तानी'मध्‍ये दिसला होता. त्‍याने अंबाजी पंतची भूमिका साकारली होती. मिलिंद २३ वर्षांचा असताना १९८९ मध्ये पहिला फोटोशूट केला होता. त्याला त्याच्या पहिल्या प्रॉजेक्टसाठी चांगली रक्कमदेखील मिळाली होती. मिलिंद सोमनने म्हटले होते की, 'साल १९८९ मध्ये मला पहिल्या जाहिरातीमध्ये काही तासांसाठी फोटोशूट करण्यासाठी ५० हजार रुपये ऑफर झाले होते आणि मला खूप आश्चर्य वाटले होते. मला वाटलं होतं की, हे लोक पूर्णपणे वेडे आहेत. मी त्यावेळी २३ वर्षांचा होतो आणि एका हॉटेलमध्ये काम करत होतो…'

मिलिंदला पहिल्याच फोटोशूटसाठी इतकी रक्कम त्यावेळी मिळाली होती. त्याच्यादृष्टीने ही रक्कम एका फोटोशूटसाठी खूपच अधिक होती. 

फोटोशूटमधुळे चर्चेत आला होता मिलिंद

१९९५ मध्‍ये मिलिंदने मधु सप्रे (एक्‍स गर्लफ्रेंड) सोबत न्यूड फोटोशूट केला होता. ज्‍यामुळे तो खूप चर्चेत आला. या फोटोशूटमुळे वाददेखील निर्माण झाला होता. १४ वर्षे कायदेशीर संघर्ष करून शेवटी २००९ मध्‍ये कोर्टाने निर्णय दिला होता. या फोटोशूट विरोधात काही ठिकाणी निदर्शने झाली तर काही ठिकाणी मोर्चे काढण्‍यात आले होते. त्‍याने पहिल्‍यांदाच टीव्‍ही शो 'कॅप्टन व्योम'मध्‍ये काम केलं होतं. 

मिलिंदचं फिटनेस

मिलिंद फिटनेसबद्‍दल सजग आहे. २ वर्षांपूर्वी त्‍याने अल्ट्रामॅनचा किताब जिंकला होता. हा जगातील सर्वांत कठीण मॅरेथॉन होतं. या स्‍पर्धेत मिलिंदने ३ दिवसांत ५१७ किमी. धावून हा किताब आपल्‍या नावे केला होता. त्‍याने २०१५ रोजी त्‍याने आयर्नमॅन चॅलेंज पूर्ण केलं होतं. या चॅलेंजमध्‍ये त्‍याने 'आयर्नमॅन ऑफ इंडिया'चा किताब जिंकला होता. हे चॅलेंज मिलिंदने ५ तास १९ मिनिटात पूर्ण केले होते. 

अंकिता कोनवारशी विवाह 

मिलिंदच्‍या खासगी आयुष्‍याबद्‍दल सांगायचं झालं तर २००६ मध्‍ये 'वॅली ऑफ फ्लॉवर्स'ची त्‍याची फ्रेंच को-स्‍टार मॅलेन जाम्‍पनोईशी विवाह केला होता. परंतु, दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. २००९ मध्‍ये दोघांनी घटस्‍फोट घेतला. त्‍यानंतर मिलिंदने अभिनेत्री सहाना गोस्‍वामीला डेट केलं. सहाना मिलिंदपेक्षा २१ वर्षांनी लहान होती. मिलिंदचं सहानासोबतचे रिलेशनशीप ४ वर्षे होतं. त्‍याने अंकिता कोनवारशी दुसर्‍यांदा विवाह केला आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT