पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतचा वाद चर्चेत आहे. चंदिगड विमानतळावर कंगनाला थप्पड मारल्याने एका CISF महिला गार्डचे निलंबन करण्यात आले. यावर विविध माध्यमातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप खासदार कंगना रनौत दिल्लीसाठी चंदिगडमधून रवाना झाली होती. पण, सिक्युरिटी चेक दरम्यान एका CISF च्या महिला गार्डने थप्पड मारलं होतं. आता यावर गायक मीका सिंहने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अधिक वाचा –
मीका सिंहने थप्पड प्रकारावर इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करून लिहिलं, 'आम्ही पंजाबी आहोत..शीख आहे…जगात आमचा सन्मान आहे, आम्हाला जगाची सेवा आणि सेवक म्हणून मानलं जातं. कंगना सोबत जे झालं, ते चुकीचे आहे. महिला कॉन्स्टेबल ड्युटीवर होती आणि त्याची जबाबदारी सुरक्षेची आहे. कुणी वैयक्तिकरित्या आसा राग काढू शकत नाही.'
अधिक वाचा –
मीका सिंहने पुढे लिहिलं, 'ही खूप दु:खाची गोष्ट आहे की, त्यांना वाटतं की, कोणत्याही पॅसेंजरवर विमानतळावर हल्ला करणे योग्य नाही. तुमच्यात असलेला राग अशाप्रकारे व्यक्त करणं अयोग्य आहे. तुम्हाला इतका राग असेल तर सिव्हिल ड्रेसमध्ये एअरपोर्टच्या बाहेर देखील काढू शकत होता. याप्रकारे एक महिला कॉन्स्टेबलमुळे अनेक महिला कॉन्स्टेबलदेखील भडकू शकतात आणि त्यांची नोकरी देखी जाऊ शकते.'
अधिक वाचा –
मीका सिंहच्या प्रतिक्रियेनंतर फॅन्स त्यांच्या पोस्टवर सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत. काही जणांनी हा प्रकार योग्य असल्याचे म्हटले तर काहींनी अयोग्य असल्याचे म्हटले.