अभिनेता सिद्दीकी विरोधात लुकआऊट नोटिस जारी करण्यात आले आहे  Instagram
मनोरंजन

बलात्कार प्रकरणात अडकलेला Actor Siddique फरार! लुकआऊट नोटिस जारी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मल्याळम अभिनेता सिद्दीकी विरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या एका अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर केरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीचा आरोप आहे की, सिद्दीकीने एका चित्रपट प्रोजेक्टवर चर्चा करण्याच्या निमित्ताने तिचे अनेकवेळा लैंगिक शोषण केले.

घरातून फरार अभिनेता सिद्दीकी

एका रिपोर्टनुसार, अभिनेता सिद्दीकी बलात्कार प्रकरणी केरळच्या हायकोर्टातून अटकपूर्व जामीन मि‍ळाला नाही. त्यानंतर तो फरार झाला आहे. हाय कोर्टाने बलात्कार प्रकरणी अभिनेता सिद्दिकीचा अटकपूर्व जामीन याचिका मंगळवार (२४ सप्टेंबर) रोजी फेटाळली होती. एका अभिनेत्रीच्या तक्रारीच्या आधारावर अभिनेत्याविरोधात हा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केरल पोलिसांच्या एका टीमने अभिनेता सिद्दीकीचा दोन घरांमध्ये शोध घेतला, पण तो सापडला नाही.

सिद्दीकी विरोधात लुकआउट नोटिस जारी

सिद्दीकीला अखेरीस ३ दिवस आधी शनिवारी सार्वजनिक ठिकाणी पाहम्यात आळे होते, जेव्हा तो दिग्गज अभिनेत्री कवियूर पोन्नम्माच्या अंत्यसंस्कारात गेला होता. रिपोर्टनुसार, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याच्या विचाराधीन आहे. आता देशभरात सर्व एक्झिट पॉईंट आणि विमानतळांवर लुकआऊट नोटिस जारी केलं आहे. त्याचे दोन्ही मोबाईल क्रमांक बंद येत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT