Mardaani-3  instagram
मनोरंजन

Box Office | राणी मुखर्जीच्या 'Mardaani-3'ची बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड, ६ व्या दिवशी किती कोटींची कमाई?

Rani Mukerji - राणी मुखर्जीच्या 'मर्दानी-३'ची बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड, सहाव्या दिवशी किती कोटींची कमाई?

स्वालिया न. शिकलगार

राणी मुखर्जीच्या मुख्य भूमिकेतील मर्दानी 3 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सहाव्या दिवशी सुमारे २ कोटींची कमाई केली असून, सहा दिवसांमध्ये एकूण जवळपास २४ कोटींचा कलेक्शन नोंदविला आहे.

Rani Mukerji Mardaani-3 Box Office collection

राणी मुखर्जी स्टारर यशराज फिल्म्सची मर्दानी-३ प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपटाने पहिल्या बुधवारीही बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड कायम ठेवलीय. २.२० कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे भारतातील ६ दिवसांचे एकूण नेट कलेक्शन २४.५५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

भारतातील मुलींच्या सुरक्षेचा कठोर आणि महत्त्वाचा सामाजिक संदेश चित्रपटातून देण्यात आला आहे. चित्रपटाने सर्वात ओपनिंग डे नोंदवली होती. मर्दानी फ्रँचायझी आणि राणी मुखर्जीच्या सोलो चित्रपटांमध्ये आजवरची ही सर्वात मोठी ओपनिंग होती. मर्दानी ३ ने पहिल्याच दिवशी ४ कोटी रुपयांची कमाई करत भारतातील महिला-केंद्रित चित्रपटांसाठी भक्कम सुरुवात केली.

मर्दानी ३ - पहिला आठवडा कलेक्शन (नेट)

शुक्रवार- ४ कोटी

शनिवार -६ कोटी

रविवार - ७.२५ कोटी

सोमवार - २.४० कोटी

मंगळवार -२.७० कोटी

बुधवार -२.२० कोटी

एकूण – २४.५५ कोटी

अभिराज मिनावाला दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित मर्दानी 3 ही फ्रँचायझी आणखी काही दिवसांत चांगली कमाई करेलं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राणी साठी हा चित्रपट खास ठरला आहे. कारण राणी मुखर्जीची सिनेमातील ३० वर्षांची कारकिर्द झाली आहे.

या चित्रपटात राणी मुखर्जी पुन्हा एसएसपी शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत दिसत आहे, ज्यातून ती ९३ हरवलेल्या मुलींच्या प्रकरणाची चौकशी करते. 

हे आकडे मर्दानी या फ्रँचायझीच्या मागील भागांच्या तुलनेत सध्या थोडे कमी दिसत आहेत. याअगोदरच्या 'मर्दानी' आणि 'मर्दानी-२' या सिनेमांनी दोन्ही वेळा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करून मोठी कमाई केली होती. 

दुसरीकडे, सध्या बॉक्स ऑफिसवर बॉडर २ सारखा दुसरा मोठा चित्रपट जोरदार पकड बनवत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मर्दानी ३ च्या कलेक्शनवरही पडत आहे. बॉर्डर २ ने रिलीजच्या १३ व्या दिवशी २९० कोटींच्या आतापर्यंतच्या कलेक्शनचा टप्पा पार केला आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT