पुढारी ऑनलाईन डेस्क - साडेतीन शक्तिपीठांच्या निर्मितीच्या महागाथेतलं पहिलं पर्व म्हणजे मातृपीठ माहूर, आणि त्याची अधिष्ठात्री रेणुका माता. रेणुका मातेच्या बालपणाचा अध्याय आपण पाहिला. मालिकेत आता पुढचा अध्याय पाहायला मिळणार आहे. रेणुका मातेने तारुण्यात पदार्पण केल्यानंतर शाकंभरी रुपात भक्तांचं रक्षण केलं. रेणुका मातेच्या शाकंभरी अवताराची गोष्ट उदे गं अंबे मालिकेतून अनुभवता येणार आहे.
पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटलं जातं. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या आदिशक्तीचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी. रेणुका मातेच्या शाकंभरी अवताराची गोष्ट मालिकेतून अनुभवायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी नक्कीच पर्वणी ठरणार आहे. उदे गं अंबे सायंकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहायला विसरु नका.