पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठी वाहिनीवरील 'भाग्य दिले तू मला' व 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या सर्वांच्या आवडत्या मालिकांचा होणार मिलाप. या मालिकांतील लोकप्रिय जोडी म्हणजेच 'भाग्य दिले तू मला'मालिकेतील राजवर्धन-कावेरी आणि 'पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेतील अर्जुन-सावि आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. (Marathi TV Serial) सध्या दोन्ही मालिकांमध्ये नात्यांचा दुरावा पाहायला मिळतोय. (Marathi TV Serial)
एकीकडे राज व त्याच्या आईच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे तर अर्जुन साविच्या नात्यात देखील दुरावा निर्माण झाला आहे. आता राज-कावेरी, अर्जुन-सावि यांना कोणत्या संकटाला सामोरं जावं लागेल? कावेरी आणि सावि त्यांच्या युक्तीने सगळ्यांना या संकटातून बाहेर काढू शकतील का? भाग्य जपणारी कावेरी आणि प्रेम जपणारी सावि राज व अर्जुनाची समजूत काढू शकतील का?
या महासंगमामुळे दोन्ही जोडप्यांच्या आयुष्यात काय बदल होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या २३ नोव्हेंबरला या विशेष भागात मिळतील. तेव्हा नक्की पहा महासंगम गुरुवारी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.