Marathi Serial time pudhari
मनोरंजन

Marathi Serial: या मराठी मालिकेची वेळ बदलली; चाहत्यांनीच नाही तर मराठी कलाकारांनीही सोशल मिडियावर नोंदवला निषेध

अभिनेत्री मेघा धाडे तसेच भाग्यश्री दळवी यांनीही या मालिकेच्या बदलेल्या वेळेबाबत नाराजी व्यक्त केली

अमृता चौगुले

मराठी मालिका आणि कथानकावर अनेकदा सोशल मिडियाच्या माध्यमातून टीका केली जाते. पण एखादी मालिका प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जाते आणि चक्क सोशल मिडियाच्याच माध्यामातून चाहते या मालिकेची बाजू मांडताना दिसत आहेत. (Latest Entertainment News)

या किस्सा घडला आहे झी मराठीवरील मालिकेबाबत. झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका आता वेगळ्या वेळेत प्रसारित होणार आहे. पण या मालिकेच्या वेळेत बदल होणार असल्याचे कळताच चाहते मात्र चांगलेच नाराज झाले आहेत. इंस्टाग्रामवर कमेंट करत त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

झी मराठीच्या इंस्टावर बोलताना प्रेक्षक म्हणतात, ‘येवढ्या चांगल्या मालिकेची वाट लावत आहेत त्या भंगार पारू साठी तुम्हाला असा वाटतंय ना की पारू ची TRP चांगली आहे तर तुम्ही तिला 6.30 ला ठेवा ना त्या बकवास देवमाणूस साठी नवरी मिळे हिटलरला बंद केली अजून तिची स्टोरी पण संपली नव्हती काय चाललात @zeemarathiofficial त्या दादा ला 11 ला टाका 6 ला टाकून TRP भेटणार नाही आणि त्या पारू ला 6.30 ठेवा 🙌 शिवा ची तर आधीच वाट लावली शेवटी त्या निर्मात्यांनी मालिका बंद केली तुमच्या आशा वागण्या मुळे. तर दूसरा युजर म्हणतो, 'तुम्हाला स्लॉट मॅनेज करता येत नसतील, शो ला प्रॉपर जस्टीस देता येत नसेल तर नवीन मालिका दाखवणे बंद करा. सावलीसोबत अन्याय करणे थांबवा. एका युजरने दुसऱ्या चॅनेलची निवड करण्याची धमकी दिली आहे. आपल्या कमेन्टमध्ये तो म्हणतो, ‘ आम्हाला 7 वाजताच बघायची आहे ही सिरियल. otherwise आम्ही दुसऱ्या चॅनेल कडे जाऊ. पारूसाठी तुम्ही दोन सिरियलचे टाइम चेंज करता म्हणजे आता काय बोलायचे.’

कोणत्या मालिकांची वेळ बदलली आहे?

झी मराठीवरील 'पारू’, 'सावळ्याची जणू सावली' आणि 'लाखात एक आमचा दादा' या मालिकांचा स्लॉट बदलला आहे. पारू ही मालिका आता सात वाजता प्रसारित होणार आहे. तर यापूर्वी सात वाजता प्रसारित होणारी सावळ्याची जणू सावळी ही आता 6.30 वाजता प्रसारित होईल. तर लाखात एक आमचा दादा ही मालिका आता संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होणार आहे.

कलाकारांनीही याबाबत नोंदवला निषेध

अभिनेत्री मेघा धाडे तसेच भाग्यश्री दळवी यांनीही या मालिकेच्या बदलेल्या वेळेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मेघा याबाबत बोलताना म्हणतात, ‘ पारू ठेवा ना 6.30 ला आमच्या सावलीचे टाइम स्लॉट का चेंज करत आहात? हे करून तीनपैकी एका सिरियलचा टाइम स्लॉट तरी वाचला जाईल. हे करून तर तुम्ही तीनही सिरियलचे नुकसान करत आहात. झी मराठी प्लीज 'सावळ्याची जणू सावली'चा टाइम स्लॉट नका चेंज करू.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT