मराठी ओटीटीवर ‘एक डाव भुताचा’ वर्ल्ड डिजिटल प्रीमियर instagram
मनोरंजन

Marathi OTT | मराठी ओटीटीवर ‘एक डाव भुताचा’ वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

Marathi OTT | मराठी ओटीटीवर ‘एक डाव भुताचा’ वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘एक डाव भुताचा’ चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये जोरदार धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ३१ ऑक्टोबर २०२४ ला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे.

कॉमेडीचे बादशाह सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे पुन्हा एकत्र येणार म्हणजे हास्याचा स्फोट होणार! या धमाल चित्रपटात त्यांच्यासोबत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ आणि अभिनेत्री मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती रेवा अग्रवाल यांनी केली असून, लेखक आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे.

चित्रपटात तुम्हाला एकापेक्षा एक बहारदार गाणी पाहायला मिळतील. ही गाणी सिनेसृष्टीतील गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत. या चित्रपटातील संगीताचे दिग्दर्शन गौरव चाटी यांनी केले आहे.

स्मशानात जन्मलेल्या आणि सतत भूत पाहणाऱ्या मदनची ही कहाणी आहे. त्याचं मधुमती नावाच्या मुलीवर प्रेम असतं पण ते प्रेम व्यक्त करायची त्याची हिंमत होत नसते. अशातच शशिकांत नावाचं भूत मदनला मधुमतीचं प्रेम जिंकून देण्यास मदतीचा हात पुढे करतो, पण त्याच्या बदल्यात एक अट घालतो. ती अट नेमकी काय? हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT