'तुला जपणार आहे'मध्ये देवीच्या कृपेने अंबिकाला खास शक्ती प्राप्त!  Tula Japnar Aahe TV serial
मनोरंजन

'तुला जपणार आहे'मध्ये देवीच्या कृपेने अंबिकाला खास शक्ती प्राप्त!

'तुला जपणार आहे'मध्ये देवीच्या कृपेने अंबिकाला खास शक्ती प्राप्त!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'तुला जपणार आहे' मालिकेने प्रेक्षकांसाठी एक वेगळं पण मनाला भावणारं कथानक टीव्हीवर पाहायला मिळत आहे. मागच्या आठवड्यात तुम्हाला पात्राची ओळख झाली असेलच. पण येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला मालिकेत काय पाहायला मिळेल याची थोडी कल्पना देत आहे. तर अंबिकाला घरात प्रवेश आणि देवीचा आशीर्वाद मिळाला आहे. देवीच्या कृपेने तिला शक्ती प्राप्त होते.

जसा घराच्या दरवाजात बांधलेला पवित्र दोरा (दहन) जळतो, तशी अंबिका वेदाचे रक्षण करण्यासाठी घरात प्रवेश करते. वेदाचे प्राण वाचतात पण जे कोण यात सामील आहेत त्यांना धडा शिकवण्याचा निश्चय अंबिका करते. दरम्यान, मीरा आपल्या वडिलांच्या सन्मानासाठी गावात मोठ्या सणाचे आयोजन करण्याचे वचन देते. ती कुंकवाचा कलश उचलून हा सण पूर्ण करण्याचा निर्धार करते. अंबिका घरात वेदाच्या जीवावर उठलेल्या लोकांना धडा शिकवत असताना, मायाला जाणवतं की पवित्र दोरा तुटला आहे. आणि नेमकं याच क्षणापासून मायाच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे उत्सवाच्या विधी एक-एक करत पूर्ण करायचा मीराचा संघर्ष सुरु आहे.

आता मीरा उत्सवाचे सगळे विधी पार करू शकेल?, अंबिका कशा प्रकारे वेदाची रक्षा करेल? 'तुला जपणार आहे' सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वा. फक्त झी मराठीवर पाहता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT