मुंबई : पुढारी ऑनलाईन
यंदा नव्या वर्षात अनेक मराठी कलाकार विवाह बंधनात अडकले. त्या त्या कलाकारांनी आपल्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटोज व्हायरलही होत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिज्ञा भावेदेखील लग्नाच्या बेडीत अडकली आहे. आता तिच्या लग्नाचा टिजर रिलीज झाला आहे.
अधिक वाचा – मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे अडकली विवाह बंधनात
६ जानेवारीला अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) आणि मेहुल पै यांचे लग्न पार पडले. अभिज्ञाच्या लग्नाचा टीझर आता व्हायरल होत असून तुम्ही हा टीजर पाहायला हरकत नाही. (Abhidnya Bhave and Mehul Pai Wedding Teaser video)
अभिज्ञाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचा टीजर व्हिडिओ शेअर केला आहे. तिने टीजरला कॅप्शन लिहिली आहे की- '६ जानेवारी २०२१. माझ्या आयुष्यातील काही आनंदाचे, भावनिक आणि खास क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार'.
अधिक वाचा – 'खुलता कळी खुलेना' फेम अभिज्ञा भावेचा साखरपुडा संपन्न (see photos)
गेल्यावर्षी अभिज्ञाने मेहुलसोबतच्या नात्याची कबुली दिली होती. दरम्यान, नवरात्रीचा शुभ मुहूर्त साधत मेहुल पैसोबत साखरपुडा उरकला होता. तिने या सोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यासोबतच तिने माझा साखरकारखाना अशी कॅप्शनदेखील दिली होती.
अभिज्ञाने जीवनसाथी म्हणून निवडलेला मेहुल पै हा मूळचा मुंबईचा असून, 'क्लॉकवर्क्स इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड'मध्ये ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. अभिज्ञाने २०१० साली 'प्यार की ये एक कहाणी' या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
२०१४ साली ती वरूण वैटिकर यांच्यासोबत विवाहबद्ध झाली होती. मात्र काही कारणास्तव नंतर ती विभक्त झाली.