मुंबई : पुढारी ऑनलाईन
मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नसराई सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये आणि लॉकडाऊननंतर सुद्धा अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. यामध्ये आता आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. 'पुढचं पाऊल' या मालिकेत समीरची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेला अभिनेता संग्राम समेळ याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. संग्रामने श्रद्धा फाटक हिच्याशी दुसरे लग्न केले आहे. त्याच्या लग्नाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
संग्राम आणि श्रद्धा यांचा विवाहसोहळा इचलकरंजी येथे पार पडला. संग्राम आणि श्रद्धा यावेळी लग्नाच्या वेशात खूपच सुंदर दिसत होते. या विवाह सोहळ्यात संग्रामचे नातेवाईक मित्रमंडळी आणि अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. संग्रामच्या मित्रमैत्रिणींनी सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यानंतर संग्राम आणि श्रद्धा या दोघांना चाहत्यांनी खूपसाऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अधिक वाचा : परिणिती-अर्जुनचा 'संदिप और पिंकी फरार'चा ट्रेलर रिलीज
याआधी संग्रामने २०१६ मध्ये 'रुंजी' फेम अभिनेत्री पल्लवी पाटीलशी विवाह केला होता. पल्लवी आणि संग्राम हे खूप वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेम निर्माण झालं आणि मग या दोघांनी लग्नं केलं होतं. मात्र हे नात फार काळ टिकलं नाही. संग्राम हा मुळचा ठाण्याचा आहे. त्यानं कॉमर्समधून आपलं शिक्षण पूर्ण केले आहे. संग्रामला अभिनयाचा वारसा त्याच्या वडील अशोक समेळ याच्यांकडून मिळाला आहे. संग्रामने नाटक, सिनेमा,मराठी मालिका यांमधून आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.
अधिक वाचा : प्रियदर्शन जाधव आणतोय 'लव सुलभ', टीजर पोस्टर लाँच
संग्रामने स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. संग्रामला 'पुढचं पाऊल' या मालिकेतून खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्याने 'एकच प्याला' या नाटकातही काम केले. याशिवाय विकी वेलिंगकर, स्विटी सातारकर, ब्रेव्ह हार्ट या चित्रपटांतही त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
(photo : rishiyshah and peepingmoonmarathi instagram वरून साभार)