मुंबई : पुढारी वृत्तसेवा
'झपाटलेला' चित्रपटात तात्या विंचूला जिवंत करणारे बाबा चमत्कार चितारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे गुरुवारी (दि. ४) वृद्धापकाळाने निधन झाले. ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ आणि अनेक मराठी चित्रपटात काम केले होते. अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह मराठीसिनेसृष्टीतल अनेक कलाकरांसोबत त्यांनी काम केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
गेली तीन दशके मराठी नाटक-चित्रपट, मालिकातून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. 'पळवापळवी', 'वाजवू का' चित्रपटात दादा कोंडके यांच्यासोबत कडकोळ यांची केमिस्ट्री भन्नाट जमली. 'पंढरीची वारी' चित्रपटातील राजा गोसावी, कडकोळ अण्णांची जुगलबंदी अविस्मरणीय ठरली.