अभिनेत्याने संपवले जीवन pudhari
मनोरंजन

Tushar Ghadigavkar: काम मिळत नसल्याने मराठी अभिनेत्याने संपवले जीवन

Marathi Actor Tushar Ghadigavkar Death: तुषार घडीगावकर या अभिनेत्याने काम मिळत नसल्याच्या विवंचनेतून जीवन संपवले आहे

अमृता चौगुले

Marathi Actor Tushar Ghadigavkar Death

मुंबई : तुषार घडीगावकर या अभिनेत्याने काम मिळत नसल्याच्या विवंचनेतून जीवन संपवले आहे. लेखक आणि अभिनेता असलेल्या तुषारला भाऊबळी या सिनेमातून ओळख मिळाली होती. तुषार बरेच वर्ष मराठी सिनेसृष्टीत कार्यरत होता. अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमधून तुषारने कामाचा ठसा उमटवला आहे. चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे याने ही पोस्ट शेयर केली आहे.

तुषारला श्रद्धांजली वाहताना तो म्हणतो, मित्रा का? कश्यासाठी? काम येतात जातात ! आपण मार्ग काढले पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही! मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत Tushar Ghadigaonkar तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो. तुषार आणि अंकुर यांनीही एकत्र काम केले होते. अंकुरच्या पोस्टवर त्याच्या इतर मित्र मैत्रिणी आणि सहकाऱ्यांनीही शोकाकुल मेसेज केले आहेत

वयाच्या 32 व्या वर्षी त्याने जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. मुळचा कणकवली येथील तुषारने रंगभूमीवरून अभिनयाला सुरुवात केली. . मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाच्या नाट्य विभागात  त्याचा सक्रिय सहभाग होता. कॉलेजनंतर रंगभूमी, मालिका, चित्रपट असा त्याचा प्रवास सुरू होता. पण या दरम्यान त्याच्या आत्महत्येची बातमी आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.

लवंगी मिरची, मन कस्तूरी रे, भाऊबळी, उनाड, झोंबिवली, संगीत बिबट आख्यान, हे मन बावरे, अलटी पालटी सुमडीत कलटी या कलाकृतींमध्ये तुषारने काम केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT