Devdatta Nage role in ghabadkund  pudhari photo
मनोरंजन

Devdatta Nage ghabadkund look| 'जय मल्हार'मधील खंडोबाच्या भूमिकेनंतर पुन्हा देवदत्त नागेचा भारदस्त अवतार

Devdatta Nage ghabadkund look| 'जय मल्हार'मधील खंडोबाच्या भूमिकेनंतर पुन्हा देवदत्त नागेचा भारदस्त अवतार

स्वालिया न. शिकलगार

Devdatta Nage look from Ghabadkund movie

'जय मल्हार' ही प्रचंड लोकप्रिय ठरलेली ऐतिहासिक मराठी मालिका सर्वश्रुत आहे. या मालिकेत खंडेरायाची भूमिका साकारून अभिनेता देवदत्त नागे याने अमाप प्रसिद्धी मिळवली. अजूनही देवदत्त नागेने साकारलेल्या खंडेरायाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. शिवाय देवदत्त नागेने याआधी ‘आदिपुरुष’मधील हनुमंत, ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’मधील सूर्याजी मालुसरे, तसेच विविध हिंदी आणि तेलुगू चित्रपटांतील भूमिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक वेळी नव्या व्यक्तिरेखेसोबत प्रयोग करण्याची त्याची शैली प्रेक्षकांना आवडली आहे.

आता अभिनेता देवदत्त नागे पुन्हा एकदा आपल्या हटके भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. आगामी मराठी चित्रपट घबाडकुंडमध्ये तो एका नव्या आणि दमदार भूमिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘घबाडकुंड’ या चित्रपटातील त्याचा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आता ‘घबाडकुंड’मध्ये तो ‘खंग्री’ नावाच्या गूढ आणि रांगड्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा तीक्ष्ण लूक, गंभीर नजर आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्स आणि भारदस्त शरीरयष्टीमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. या भूमिकेसाठी देवदत्तने स्वतःच्या लूकमध्ये मोठा बदल केल्याची चर्चा आहे.

दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी कल्पनारम्य आणि थरारक विश्व मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या कथानकाला निर्माते डॉ. रसिक कदम यांची साथ लाभली आहे.

देवदत्त नागेच्या नव्या अवतारामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘आदिपुरुष’मधील हनुमंत असो वा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’मधील सूर्याजी मालुसरे; ‘सत्यमेव जयते’मधील इन्स्पेक्टर शंकर गायकवाड असो ना ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ मधील पोलीस अधिकारी प्रत्येक भूमिकेत तो परफेक्ट आहे. मराठी-हिंदीच नव्हे तर तेलगू चित्रपट ‘कमसराजू’ मधील ‘देवकी नंदन वासुदेवा’सारख्या विविध व्यक्तिरेखांमधून त्याने आपल्या अभिनयाचे कौशल्य सिद्ध केलं आहे.

‘आयकॉन दी स्टाईल’ निर्मित ‘घबाडकुंड’ हा चित्रपट १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT