छेड काढणाऱ्याला तरुणाला इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरने शिकवला चांगलाच धडा; व्हिडिओ व्हायरल Pudhari
मनोरंजन

Mansi Suravase Viral Video: छेड काढणाऱ्याला तरुणाला इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरने शिकवला चांगलाच धडा; व्हिडिओ व्हायरल

मानसीचे इंस्टाग्राम 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Shivani Badadhe

Mansi Suravase News: अलीकडे मुलींचे छेड काढण्याचे, त्यांचे लैंगिक शोषण केलेल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर मानसी मंजू सतीश सुरवसे हीच आहे. तिने नुकताच सोशल मीडिया एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने एक मुलाच्या कानशिलात लगावली आहे. मानसीचे इंस्टाग्राम 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

नेमकं घडलं काय?

मानसी तिच्या इमारतीच्या पायऱ्यांवर व्हिडिओ शूट करत होती तेव्हा अचानक एक मुलगा तिथे आला, त्याला वर जाण्यासाठी वाट देत मानसी बाजूला सरकली. पण तो मुलगा थेट वर न जाता तिच्या शरीराला स्पर्श करुन पुढे गेला. असे घडताच मानसीने त्याला अडवले आणि तुझा काय प्रॉब्लेम आहे? असे विचारत जोरदार त्याच्या कानशिलात लगावली. तिचा हा व्हिडिओ सध्या जोरदार चर्चेत आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करत ती म्हणाली की, मी माझ्या बिल्डिंगमध्येच एक व्हिडिओ शूट करत होते. तेव्हा हा मुलगा तिथे आला आणि मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून पळ काढत होता. जेव्हा मी हा व्हिडिओ प्रूफ म्हणून त्याच्या घरच्या लोंकाना दाखवला तेव्हा त्याच्या घरच्यांनी मला सांगितलं की त्याची मानसिक स्तिथी खराब आहे. त्याच्या डोक्याचा जर प्रॉब्लेम असेल तर तो काहीही करणार का?

पुढे तिने लिहिले आहे की, आपल्याकडे लोक स्त्रियांना नेहमी तिच्या कपड्यांवरून जज करत असतात. पण मी तर इथे ठीकठाकच कपडे घातलेले आहे तरीही त्याने माझ्यासोबत असे कृत्य केले. हे योग्य आहे का? अशा समाजाचा सुद्धा धिक्कार जे महिलांना त्यांच्या कपड्यांवरून जज करतात. मला १०००% गॅरंटी आहे की मी जर कुर्ता किंवा साडी नेसली असते तरीही त्याने असच काहीस कृत्य केलं असत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT