मनोज वाजपेयी हरहुन्नरी कलाकार आहे. त्याने नेहमीच चाकोरी बाहेरच्या भूमिका साकारल्या आहेत. 'गंग ऑफ वासेपूर, दाऊद, सत्या, तमन्ना, सरकार- ३' असे एकाहून एक सरस चित्रपट मनोजने दिले आहेत. १९९८ मध्ये मनोजचा 'सत्या' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर तगड़ी कमाई केली होती. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. त्यामध्ये मनोज हा भिकू म्हात्रे पात्रात होता. आता पुन्हा मनोज राम गोपाल वर्मा यांच्यासोबत काम करणार आहेत.
मनोज म्हणाला की, प्रेक्षक आणि चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राम गोपाल वर्मा हे त्यांचा आगामी चित्रपट माझ्यासोबत बनवणार आहेत. पण, त्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्यावा लागणार आहे. त्यानंतर आम्ही या चित्रपटाच्या तारखांवर बोलणार आहोत. तारखा ठरल्यानंतर लगेचच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. मी हे भिकू म्हात्रेचे पात्र साकारले त्यावेळी माझ्यात एक वेगळी ऊर्जा होती. आता ती ऊर्जा राहिलेली नाही. प्रत्येक वयाचे त्या त्या वेळचे एक वेगळेच रूप असते. आता मनोजचा लवकरच 'डिस्पॅच' हा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे