अभिनेता मनोज वाजपेयी.  Pudhari News.
मनोरंजन

Manoj Bajpayee : “'अज्ञातांनी माझ्या कुटुंबाला टार्गेट केलं...' : 'गजब रात' वादावर अभिनेता मनोज वाजपेयींचा मोठा खुलासा!

Manoj Bajpayee on Gajab Raat controversy : चित्रपट सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात 'घुसखोर पंडित' नावाने प्रदर्शित होणार होता

पुढारी वृत्तसेवा

Manoj Bajpayee on Gajab Raat controversy : अभिनेता मनोज वाजपेयी यांनी नेटफ्लिक्सवरील चित्रपटाशी संबंधित वादाबद्दल भाष्य केले आहे. या वादाचे स्वरूप वैयक्तिक झाले .ऑनलाइन माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले. काही लोकांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो शेअर केले आणि धमकावणारे मेसेज पोस्ट केल्याचे पाहून आपण हतबल झालो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे

नेमका वाद काय?

मनोज वाजपेयींची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'गजब रात' या चित्रपटाचे नाव आधी 'घूसखोर पंडित' असे होते. फेब्रुवारी महिन्यात या नावाची घोषणा झाली होती. मात्र या नावावर टीकेची झोड उठली. नावावर आक्षेप नोंदविण्यात आला होता. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलून 'गजब रात' असे केले. मात्र, या मुद्द्याला एवढे मोठे वळण मिळेल अशी अपेक्षा नव्हती, असे मनोज वाजपेयी म्‍हणाले.

कुटुंबाला वादात ओढल्याने व्यथित

'पीटीआय'शी बोलताना मनोज वाजपेयी यांनी स्पष्ट केले की, चित्रपटावर झालेल्या टीकेपेक्षा त्याच्या कुटुंबाला यात ओढल्या गेल्याचे दुःख जास्त झाले. सोशलवरील अनेक पोस्ट या 'बॉट' (बनावट अकाऊंट्स) आणि चेहरा नसलेल्या निनावी लोकांकडून केल्या जात होत्या, त्यामुळे यामागे नक्की कोण आहे हे शोधणे कठीण झाले होते.

नकारापासून सुरू झालेला माझा प्रवास इथेपर्यंत पोहोचला आहे....

"तुम्ही माझ्यावर कितीही टीका करा, वाईट बोला, मी ते सहन करेन. कारण मी एक अभिनेता आहे. नकारापासून सुरू झालेला माझा प्रवास इथेपर्यंत पोहोचला आहे. या प्रवासात माझी सहनशीलता वाढली आहे; पण खरी काळजी आणि राग माझ्या कुटुंबाचे फोटो पोस्ट करून वाईट मेसेज पोस्‍ट करायला सुरुवात केल्‍यावर प्रचंड राग आला होता," असेही वाजपेयी यांनी स्‍पष्‍ट केले.

समोर सगळे निनावी आणि चेहरा नसलेले लोक

"मी आयुष्यात अत्यंत शांत आणि मनमोकळा स्वभाव असलेला माणूस आहे. मला नेहमी आनंदी राहायला आवडते; पण जेव्हा माझ्या जवळच्या माणसांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा मी सामोरे जाण्यासही मागे हटत नाही. मात्र, इथे विरोध तरी कोणाला करायचा? कारण समोर सगळे निनावी आणि चेहरा नसलेले लोक होते," असेही वाजपेयी म्‍हणाले.

भीती झुगारून आपले काम करीत राहिलो

मनोज वाजपेयी म्हणाले की, चित्रपटाचे मूळ नाव निवडताना टीमने ५ ते ६ नावांचा विचार केला होता. कथेला आणि पात्राला ते नाव अगदी योग्य वाटत होते; परंतु त्यावरून इतका मोठा वाद निर्माण होईल याची कल्पना कोणालाच नव्हती. चित्रपट काय आहे हे न जाणून घेताच लोकांनी केवळ नावावरून टीका करायला सुरुवात केली. या वादादरम्यान मनोज वाजपेयी आणि त्यांच्या कुटुंबाला थेट धमक्याही मिळाल्या. काही ठिकाणी स्थानिक प्रशासनाने त्यांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता, तरीही मी भीती झुगारून आपले काम करत राहिलो. दरम्यान, 'गजब रात' या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश शाह यांनी केले आहे. या चित्रपटात मनोज वाजपेयी यांच्यासोबत नुसरत भरुचा, साकिब सलीम, अक्षय ओबेरॉय, दिव्या दत्ता, किकू शारदा आणि श्रद्धा दास यांच्या मुख्य भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT