"मनमौजी" चित्रपटाचा ट्रेलर लाँच  instagram
मनोरंजन

Manmauji Movie | सायली संजीव, भूषण पाटील यांचा 'मनमौजी' यादिवशी येणार

"मनमौजी" चित्रपटाचा ट्रेलर लाँच

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - मुलगी किंवा बायका न आवडणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात एक नाही तर चक्क दोन तरुणी येतात आणि त्या तरुणाचं काय होतं याची धमाल, मनोरंजक गोष्ट 'मनमौजी' या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च नुकताच करण्यात आला आहे. आतापर्यंत पोस्टर आणि टीजरमध्ये दिसलेल्या फ्रेशनेसमुळे चित्रपटाविषयी आधीच असलेलं कुतुहल आता आणखी वाढलं आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला "मनमौजी" हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. (Manmauji Movie )

गुलाबजाम, लॉस्ट अँड फाऊंड अशा चित्रपटांची निर्मिती केलेल्या गोल्डन गेट मोशन पिक्चर्सच्या विनोद मलगेवार यांनी "मनमौजी" चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शीतल शेट्टी यांचे आहे. प्रसाद भेंडे कॅमेरामन, क्षितिज पटवर्धन आणि वलय मुळगुंद यांनी गीतलेखन, अमितराज आणि पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात अभिनेता भूषण पाटील अभिनेत्री सायली संजीव, सिनेसृष्टीत प्रथमच पदार्पण करणारी रिया नलावडे, जयवंत वाडकर, अरुण नलावडे, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कार्यकारी निर्माता म्हणून संदीप काळे यांनी काम पाहिले आहे. (Manmauji Movie )

मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात दोन तरुणी येतात, त्यानंतर या तरुणाचे मुलींविषयीचे विचार बदलतात का? त्याचं प्रेम जडतं का? अशा आशयसूत्रावर "मनमौजी" हा चित्रपट बेतला आहे. प्रेमकथेशिवाय कथेला अनेक भावनिक पदर असल्याचंही आपल्या ट्रेलरमधून पाहायला मिळतं. उत्तम कलाकार, रंजक गोष्ट, नेत्रसुखद लोकेशन्स, श्रवणीय संगीत याचा मिलाफ "मनमौजी" चित्रपटातून नक्कीच अनुभवायला मिळणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT