'कोण होतीस तू, काय झालीस तू' मालिकेतून मंदार जाधव येणार भेटीला Mandar Jadhav
मनोरंजन

'कोण होतीस तू, काय झालीस तू' मालिकेतून मंदार जाधव येणार भेटीला

Mandar Jadhav : 'कोण होतीस तू, काय झालीस तू' मालिकेतून मंदार जाधव येणार भेटीला

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क ; स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता मंदार जाधव नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कोण होतीस तू, काय झालीस तू' या नव्याकोऱ्या मालिकेत मंदार यश धर्माधिकारी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं मधील जयदीप-गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. महाराष्ट्राची ही लोकप्रिय जोडी 'कोण होतीस तू, काय झालीस तू' या नव्या मालिकेतून कावेरी आणि यशच्या रुपात पुन्हा एकदा आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

'कोण होतीस तू, काय झालीस तू' मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना मंदार म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत काम करणं नेहमीच आनंददायी अनुभव असतो. श्री गुरुदेव दत्त, सुख म्हणजे नक्की काय असतं नंतर आता कोण होतीस तू, काय झालीस तू ही तिसरी मालिका स्टार प्रवाहसोबत करतोय. आधीच्या दोन्ही भूमिकांपेक्षा वेगळी अशी ही व्यक्तिरेखा आहे. या मालिकेत मी यश धर्माधिकारी हे पात्र साकारतोय. दिसायला अतिशय देखणा, आपल्या लूक्सबद्लल सदैव जागृक असलेल्या यशला फॅशनची उत्तम जाण आहे.

अनेक मुली यशच्या प्रेमात आहेत. मात्र, यशने आईला वचन दिलं आहे की, तिच्या आवडीच्या मुलीशीच लग्न करेन. त्याचं त्याच्या कुटुंबावर आणि खास करुन त्याच्या आईवर प्रचंड प्रेम आहे. आई जे सांगेल त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. हे पात्र साकारताना खूप गोष्टी नव्याने शिकायला मिळत आहेत. मला खात्री आहे जे प्रेम प्रेक्षकांनी जयदीप या पात्राला दिलं तेच प्रेम यश या पात्रावर देखील करतील'. नवी मालिका कोण होतीस तू, काय झालीस तू २८ एप्रिलपासून रात्री ८ वाजता पाहायला मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT