मल्लिकाचा 'मर्डर'च्या सेटवरचा अनुभव  Mallika Sherawat
मनोरंजन

Mallika Sherawat : दोघांनी मला कंफर्टेबल केलं; मल्लिकाचा 'मर्डर'च्या सेटवरचा अनुभव

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिला 'मर्डर' या बोल्ड चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. तिने सिनेमात अभिनेता इम्रान हाश्मीसोबत बोल्ड सीन्स दिले. त्याची अद्यापही चर्चा सुरू असते. 'मर्डर' हा सिनेमा महेश भट यांनी दिग्दर्शित केला होता, आता मल्लिका अनेक वर्षांनंतर पुन्हा हिंदी सिनेमात दिसत आहे. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या सिनेमामध्ये तिने भूमिका साकारली आहे. आता मल्लिकाने तिच्या 'मर्डर' या सिनेमातील सीनबाबत भाष्य केले आहे.

एका मुलाखतीत मल्लिका म्हणाली आहे की, महेश भट यांच्या सेटवर नेहमीच सुरक्षित वाटते. 'मर्डर'च्या वेळी सेटवर खूप सकारात्मक वातावरण तयार करण्यात आले होते. महेश भट आणि इम्रान या दोघांनीही मला खूप कंफर्टेबल केले. सेटवर युनिटचे अन्य लोकही असल्याने थोडे विचित्र वाटले होत; पण इम्रान खूप चांगला माणूस आहे, त्याने मला खूप मदत केली.

महेश भट यांच्या सेटवर सर्वच मुली सुरक्षित असतात. 'मर्डर' हा सिनेमा २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर मल्लिकाला बॉलीबूडमध्ये बऱ्याचवेळा कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागले होते. यामुळे ती हळूहळू बॉलीवूडपासून दूर गेली. अनेक वर्षे मल्लिका विदेशात स्थायिक होती; पण आता पुन्हा ती बॉलीवूडपटात झळकत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या सिनेमाची उत्सुकता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT