'मर्डर' नंतर मल्लिकाला द्वेषाचा सामना करावा लागला होता instagram
मनोरंजन

Mallika Sherawat | 'मर्डर' नंतर मल्लिकाला करावा लागला द्वेषाचा सामना

'मर्डर' नंतर मल्लिकाला करावा लागला द्वेषाचा सामना

पुढारी वृत्तसेवा

मल्लिका शेरावत हिची सध्या खूपच चर्चा रंगली आहे. बऱ्याच काळानंतर ती बॉलीवूडमध्ये परतली आहे. मल्लिकाला २००४ मध्ये आलेल्या 'मर्डर' या सिनेमातील बोल्ड सीन्समुळे खूपच लोकप्रियता मिळाली असली, तरी त्यानंतर तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. तिच्या या प्रतिमेमुळे बडे स्टार कलाकार तिला रात्री फोन करून भेटायला सांगायचे.

एका मुलाखतीत मल्लिका म्हणाली की, दुबईमध्ये एका चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी मध्यरात्री एका हिरोने माझा खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तडजोड न केल्याने माझ्या हातून २० ते ३० सिनेमे निसटले. 'डर्टी पॉलिटिक्स' या चित्रपटाच्या पोस्टरवरून मी वादात अडकले होते. मी २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जीना सिर्फ मेरे लिए' या चित्रपटातून माझ्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात मी सीमा नावाच्या मुलीची छोटीशी भूमिका साकारली होती, ज्याची कोणीच दखल घेतली गेली नाही. पण, त्यानंतर 'ख्वाहिश' या सिनेमाची खूपच चर्चा झाली. मी या चित्रपटात अभिनेता हिमांशू मलिकसोबत १७ किसिंग सीन दिले होते आणि बॉलीवूडमध्ये खूपच खळबळ उडाली होती. 'मर्डर' या सिनेमाला घवघवीत यश मिळाल्यानंतरही मला लोकांच्या द्वेषाचा सामना करावा लागला. 'मर्डर' या सिनेमाच्या यशानंतरही मला स्वतःची लाज वाटावी, अशी लोकांची इच्छा होती. तडजोड केल्याशिवाय काहीच मिळत नसले, तरी आपण स्वतः काय करायचे, हे ठरवावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT