मलायका अरोराच्या वडिलांनी आज सकाळी आपले जीवन संपवले  Youtube
मनोरंजन

मलायका अरोराच्या वडिलांनी इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी वांद्रा येथील इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले. सकाळी ९ वाजता ही घटना घडली. मलायका पुण्यात होती. तिला ही घटना समजताच आता ती मुंबईला येण्यासाठी रवाना झालीय. अद्याप अरोरा फॅमिलीने या घटनेची माहिती दिलेली नाही. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांकडून तपास सुरु आहे. (Malaika Arora Father Death)

अनिल अरोरा मागील काही काळापासून आजारी होते, अशी माहिती समोर येत आहे. पोलिसांना प्राथमिक तपासात कोणतीही चिठ्ठी मिळालेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. बाबा रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आल्याचे समजते.

अनिल अरोरा पंजाबी हिंदू परिवारातील असून ते मर्चेंट नेवीमध्ये होते.

मागील वर्षी जुलै २०२३ मध्ये अनिल अरोरा आरोग्याच्या कारणास्तव मुंबईतील एका रुग्णालयात दाखल झाले होते. त्यावेळी मलायकाची आई रुग्णालयात स्पॉट झाली होती.

दरम्यान, मलायकाचा एक्स पती अरबाज खान परिवारासह घटनास्थळी पोहोचला आहे.

video - voompla इन्स्टा वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT