मलायका अरोरा ही तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक आयटम साँग करत तिने प्रेक्षकांना चांगलेच घायाळ केले आहे. वयाची पन्नाशी गाठलेल्यानंतरही मलायकाच्या सौंदर्यात आणि फिटनेसमध्ये काहीच फरक पडलेला नाही. नुकताच मलायकाने तिचा ५१ वा वाढदिवस साजरा केला. मलायकाचा एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूर याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नसल्याचे समोर आले आहे. त्याने मलायकाच्या वाढदिवशी कोणतीच पोस्ट केली नाही. पण, तिच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी मात्र अर्जुनने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. यावर आता चांगलीच चर्चा रंगली आहे.
अर्जुन या पोस्टमध्ये म्हणतो की, तुम्ही कोण आहात, हे कधीही विसरू नका. 'द लायन किंग' असे म्हटले आहे. अर्जुन आणि मलायका है गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावर फोटो शेअर करत ते त्यांच्यातील प्रेम व्यक्त करताना दिसायचे. पण, काही महिन्यांपूर्वी त्यांचे करत ते त्यांच्यातील प्रेम व्यक्त करताना दिसायचे. पण, काही महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले. मलायकाने १९९८ मध्ये अरबाज खानशी लग्नगाठ बांधली होती. सुमारे १९ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. अरबाजशी घटस्फोट झाल्यानंतर मलायका ही अर्जुनसोबत होती; पण त्यांचे नाते मात्र टिकले नाही.