माझी प्रारतना चित्रपट लवकरच भेटीला येत आहे  Instagram
मनोरंजन

Majhi Prarthana | अंगावर काटा आणणारा "माझी प्रारतना" चा टिझर पाहिला का?

Majhi Prarthana Movie | अंगावर काटा आणणारा "माझी प्रारतना" चा टिझर पाहिला का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला, पण सर्वांंना प्रेम सहज मिळत नाही. अशीच एक अभूतपूर्व प्रेम कथा येत्या ९ मे २०२५ ला आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. पद्माराज राजगोपाल नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" हा नवा सिनेमा आपल्या भेटीला येत आहे. ह्याच चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित झालाय.

प्रेम, प्रेमातील विश्वासघात आणि त्या विकट परिस्थितीत प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द या टिझरमध्ये पहायला मिळते. "माझी प्रारतना" हा सिनेमा ब्रिटिश काळात, महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेली संगीत प्रधान प्रेम कथा आहे. आयुष्यात किती ही अडचणी असतील तरी प्रेम मात्र जीवनात सर्वकाही जिंकण्याची ताकद आहे अशी स्तब्ध करणारी ही कहाणी आहे.

या चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मराठी सिनेश्रुष्टीतील आणखी काही उत्कृष्ट कलाकार आपल्याला दिसणार आहेत. एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत "माझी प्रारतना" या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर यांनी केलं आहे, पद्माराज नायर फिल्म्स ह्यांची निर्मिती आहे तर विश्वजित सी टी ह्यांनी संगीत दिलंय.

सिनेमाचं पोस्टर आणि आता टिझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अपरिमित ताकद, अथांग समर्पण, असे प्रेम, जे इतिहासावर स्वतःची छाप सोडेल असा हा "माझी प्रारतना" सिनेमा ९ मे २०२५ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT