महेश मांजरेकरांचा ‘एक राधा एक मीरा’ चित्रपट घेऊन येत आहेत instagram
मनोरंजन

Mahesh Manjarekar Movie | महेश मांजरेकरांचा ‘एक राधा एक मीरा’ चित्रपट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट, स्लॉव्हेनियामध्ये चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. मराठीतील एक ‘बिग बजेट’ चित्रपटांपैकी चित्रपट, अशा अनेक वैशिष्ट्यांसह पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘एक राधा एक मीरा’ या म्युझिकल लव्ह स्टोरीबद्दल रसिकांमध्ये उत्कंठा लागून राहिली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा अधिकृत टीझर प्रदर्शित केला आहे. अत्यंत ग्लॅमरस आणि हटके अशा या चित्रपटाची निर्मिती अविनाशकुमार प्रभाकर आहाले यांनी केली आहे. त्यात गश्मीर महाजनी, मृण्मयी देशपांडे, सुरभी भोसले, संदीप पाठक, मेधा मांजरेकर आदींच्या भूमिका आहेत.

‘एक राधा एक मीरा’ हा महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. सोनू निगम, शाल्मली खोलगाडे, सुखविंदर सिंग यांसारख्या दिग्गज गायकांच्या फौजेने चित्रपटाचे पार्श्वगायन केले आहे. सध्याचा आघाडीचा गायक विशाल मिश्रा यांनी या चित्रपटाचे संगीत दिले आहे.

‘प्रेम म्हणजे आतल्या आत गुंगुंलेले गाणे..’ ‘प्रेम म्हणजे स्वतःतच स्वतःला हरवत जाणे...’ ‘प्रेम म्हणजे कुणालातरी हवेहवेसे वाटणे...’ ‘प्रेम म्हणजे कुणीतरी आभाळ होवून दाटणे...’‘फक्त जेव्हा ती आभाळ होऊन दाटेल तेव्हा इतकेच व्हावे...धरती होवून मी स्वतःला अंथरलेले असावे...’अशा आशयाचे भिडणारे शब्द या टीझरच्या पार्श्वभागी ऐकू येतात.

सोबत एक मजेशीर बडबडगीत ऐकू येते आणि त्याद्वारे चित्रपट हा एक सांगीतिक मेजवानी आहे हे कळून चुकते. आहालेज प्रॉडक्शनची निर्मिती असून त्यात छान छान, सुंदर व भावणारे चेहरे हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT