Marathi Movie Ranapati Shivray Swari Agra  instagaram
मनोरंजन

Marathi Movie | ‘महारुद्र शिवराय’ गीतासोबत अभिजीत श्वेतचंद्रची पहिली झलक, 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' लवकरच भेटीला

Marathi Movie Ranapati Shivray Swari Agra | ‘महारुद्र शिवराय’ गीतासोबत अभिजीत श्वेतचंद्रची पहिली झलक समोर, 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' लवकरच भेटीला

स्वालिया न. शिकलगार

मराठी ऐतिहासिक चित्रपट ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटातील ‘महारुद्र शिवराय’ हे गीत नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गीतासोबत अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिली झलक समोर आली असून, सोशल मीडियावर या गाण्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Marathi Movie Ranapati Shivray Swari Agra first look

मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक विषयांवरील चित्रपटांना नेहमीच विशेष स्थान राहिले आहे. अशातच लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील ‘महारुद्र शिवराय’ या दमदार गीताचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले आहे. या गीतासोबत अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिली झलक समोर आली असून त्याच्या लूकची चर्चा होत आहे.

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा नसून शिवरायांच्या शौर्य, रणनीती आणि स्वराज्याच्या संकल्पनेचा गौरव करणारा अनुभव आहे. भरजरी वस्त्र, शिरोभागी आकर्षक जिरेटोप, गळ्यात आभूषणांसह कवड्यांची माळ, हातात धारेदार तलवार यांसह चेहऱ्यावरील भाव ...सर्वकाही उत्कृष्ट या झलकमधून दिसते.

यादिवशी चित्रपट येणार भेटीला

या चित्रपटात शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेच्या ऐतिहासिक घटनेवर विशेष भर देण्यात आला आहे. ‘स्वारी आग्रा’ हा शिवरायांच्या आयुष्यातील अतिशय धाडसी आणि बुद्धिमत्तेचा काळ होता. तो काळ मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ३० जानेवारीला चित्रपट भेटीला येणार आहे.

शिवराज अष्टकातील हे सहावे पुष्प असून लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी रणपति शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अमूल्य इतिहास उजेडात आणला आहे. चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या रूपात अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र दिसणार असून यावेळी ‘महारुद्र शिवराय’ गीताचे दमदार सादरीकरण केले आहे.

दिग्पाल लांजेकर यांनी हे गीत लिहिले आहे. स्वरसाज अवधूत गांधी, अमिता घुगरी, मयूर राऊत यांचे संगीत आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, विपुल अग्रवाल, जेनील परमार, मुरलीधर छतवानी चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी, तान्शा बत्रा, आलोक शर्मा आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT