महाराष्ट्राची हास्यजत्रा शो लवकरच भेटीला येत आहे  instagram
मनोरंजन

'महाराष्ट्राची हास्यजत्रा', कॉमेडीची हॅटट्रीक! या दिवसापासून भेटीला

Maharashtrachi Hasyajatra| 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', कॉमेडीची हॅटट्रीक! या दिवसापासून भेटीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाची नवी पर्वे, त्यातील नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आता कॉमेडीची हॅट्ट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वामध्ये आपल्याला नक्कीच नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे आजवर ८०० पेक्षा अधिक भाग प्रसारित झाले आहेत. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहेत.

२ डिसेंबरपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', कॉमेडीची हॅट्ट्रीक हे नवे पर्व सुरू होणार आहे. या पर्वाचे वैशिष्ट्य काय असणार आहे, याबद्दल 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले, "प्रेक्षकांनी यापूर्वी प्रहसनांच्या अनेक मालिका पाहिल्या. यांतून अनेक पात्रे लोकप्रिय झाली. पण, ती पात्रे फक्त त्या-त्या मालिकेमध्ये पाहिली. या नव्या पर्वामध्ये वेगवेगळ्या मालिकांमधली पात्रे एकमेकांच्या मालिकांमध्ये जाऊन धमाल करताना प्रेक्षकांना पाहायला मिळतील. ह्या पर्वात हा नवा प्रयोग आपल्याला पाहता येईल. यातून नक्कीच मोठा हास्यकल्लोळ निर्माण होईल आणि तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे निर्माते आणि लेखक सचिन मोटे म्हणाले, "यंदाच्या पर्वात प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये काही नवनवीन पात्रे पाहायला मिळतील." 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे लेखक पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत आणि आधीच्या विषयांमध्ये नवीन पात्रांचा आणि गोष्टींचा समावेश करून ते सादर करण्यात येणार आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे विशेष प्रोमोज प्रेक्षकांना आवडताहेत. पहिल्याच काही भागांमधला आश्चर्यचकित करणारा पहिलाच भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पैलवान प्राजक्ता चव्हाण आपल्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये प्रहसन सादर करताना दिसणार आहे. 'तुजं माजं सपान' या मालिकेतून दिसलेला तिच्यातला मुळातला रांगडेपणा प्रेक्षकांना भावला होता. तोच अभिनय आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हास्यवीरांसह रंगलेले तिचे धमाल असे प्रहसन प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. तिचा कोल्हापुरी ठसका आणि कोल्हापुरी ठसकेबाज भाषा आता हास्यजत्राच्या मंचावर पाहायला मिळेल.

तर पाहायला विसरू नका, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', कॉमेडीची हॅटट्रीक, २ डिसेंबरपासून सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT