Maharashtra Municipal Election Voting celebrities casting vote instagram
मनोरंजन

Maharashtra Municipal Election |'आम्ही मतदानाचा हक्क बजावला, तुम्ही कधी?' किशोरी अंबिये, प्राजक्ता माळीची पोस्ट व्हायरल

Maharashtra Municipal Election Voting | ४ तास प्रवास करून नाना पाटेकरांनी केलं मतदान, हेमा मालिन ते आमिर खान सेलेब्सनी बजावला हक्क

स्वालिया न. शिकलगार

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांदरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींनी मतदान करून लोकशाहीप्रती आपली बांधिलकी दाखवली. विशेषतः नाना पाटेकर यांनी चार तासांचा प्रवास करून मतदान केल्याने नागरिकांमध्ये मोठी प्रेरणा निर्माण झाली. हेमा मालिनी, आमिर खान यांच्यासह अनेक कलाकारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावत “मतदान हे आपले कर्तव्य आहे” असा स्पष्ट संदेश दिला.

Maharashtra Municipal Election Voting bollywood celebrities casting vote

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, यंदा या निवडणुकीत सामान्य नागरिकांसोबतच बॉलिवूडमधील अनेक नामवंत सेलिब्रिटींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मतदान हा केवळ हक्क नसून जबाबदारी आहे, हे या कलाकारांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी तब्बल चार तासांचा प्रवास करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. इतका मोठा प्रवास करूनही त्यांनी मतदानाला प्राधान्य दिल्याने सोशल मीडियावर त्यांचे प्रचंड कौतुक होत आहे.

दरम्यान, मराठी सेलेब्स संस्कृती बालगुड, गायक अभिजीत सावंत, अरुण कदम, प्राजक्ता माळी, हेमंत ढोमे, किशोरी अंबिये, उर्मिला कोठारे, अमेय वाघ यांनी मतदान केल्यानंतरचे फोटो पोस्ट केले.

अभिनेते परेल रावल आणि राकेश रोशन यांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच सोनाली बेंद्रे पती गोल्डी बहल आणि आपल्या मुलासोबत मतदानाला पोहोचली. यावेळी ग्रीन कलर ड्रेसमध्ये करिश्मा कपूर तर व्हाईट ड्रेसमध्ये श्रद्धा कपूरने मतदान केले.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर पुण्याहून तीन ते चार तासांचा प्रवास करून मुंबईत मतदान करायला पोहोचले. ते माध्यमांना म्हणाले, "मला वाटतं की, माझ्या अस्तित्वाची निशाणी मतदान करणं आहे आणि यासाठी मी ३-४ तास पुण्याहून ट्रॅव्हल केलं आणि आता परतत आहे यासाठी कृपया मतदान अवश्य करा."

मुंबईत अभिनेता अक्षय कुमार मतदान केंद्रावर लवकर पोहोचल्यानंतर, त्यांची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्ना यांनीही गुरुवारी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीदरम्यान ट्विंकल गांधी शिक्षण भवन मतदान केंद्रावर दिसली. मतदान केल्यानंतर, ट्विंकलने माध्यमांशी संवाद साधला आणि निवडणुकीत भाग घेणे का महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले.

हेमा मालिनी म्हणाल्या, ''मी लोकांना बाहेर येऊन मतदान करण्याची विनंती करते. जसे की, आज सकाळी मी वोट करण्यासाठी आले. जर तुम्हाला मुंबईत सुरक्षा, प्रगती, स्वच्छ हवा आणि खड्डेविरहित रस्ते हवे आहेत तर आपल्या सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल आणि मतदान करायला हवे...''

जॉन अब्राहम आपल्या आई-वडिलांसह मत देण्यासाठी पोहोचला, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बीएमसी निवडणुकीसाठी बॉलीवूड सेलेब्स अक्षय कुमार, तमन्ना भाटिया, गुलजार, जुनैद खान, किरण राव, सुनील शेट्टी, आमिर खान पोहोचले आणि मतदानाचा हक्क बजावला.

आमिर खान कुटुंबीयांसह पोहोचला. यावेळी त्याची एक्स वाईफ किरण राव, रीना दत्ता, मुलगी ईरा खान, मुलगा जुनैद खानने मत दिले.

अक्षय कुमार ब्लू शर्ट - पँटमध्ये कूल लुकमध्ये दिसला. ९१ वर्षांचे गुलजार यांनी मतदानाचा अधिकार बजावला. जोया अख्तर, सुनील शेट्टी, तमन्ना भाटिया यांनी मतदान केलं.

(instagram video- viral bhayani इन्स्टावरून साभार)

मराठी सेलिब्रिटींचे मतदान

संस्कृती बालगुडेने मतदानाचा हक्क बजावला.

संस्कृती बालगुडे

गायक अभिजीत सावंत आणि शिल्पा सावंत यांनी मतदान केले

अभिजीत सावंत आणि शिल्पा सावंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT