New Movie magazine release date out  Pudhari photo
मनोरंजन

New Movie|'आपलं खरं घर कुठे?' Gen Z च्या भावविश्वावर आधारित 'मॅगझिन'चा फर्स्ट लुक प्रदर्शित; यादिवशी येतोय भेटीला

'आपलं खरं घर कुठे?' Gen Z च्या भावविश्वावर आधारित 'मॅगझिन'चा फर्स्ट लुक प्रदर्शित; यादिवशी येतोय भेटीला

पुढारी वृत्तसेवा

आजची 'Gen Z' (जेन झी) पिढी जगभर फिरते, करिअर आणि नव्या संधींचा शोध घेते; पण या प्रवासात तिच्या मनात एक प्रश्न कायम फिरत असतो, 'आपलं खरं घर नेमकं कुठे आहे?' याच भावनिक प्रश्नाचा वेध घेणारा आणि तरुण पिढीचं नवं विश्व पडद्यावर मांडणारा 'मॅगझिन' हा मराठी चित्रपट येत्या २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर आणि फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याच्या हटके टायटलने आणि दृश्यांनी सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दोन पिढ्यांमधील संवादाचा भावनिक पूल

सोशल मीडियाच्या युगात आणि धावपळीच्या जीवनशैलीत वाढलेली जेन झी एकीकडे आधुनिक जगाशी जोडलेली आहे, तर दुसरीकडे आपल्या मुळांशी असलेले नातं शोधण्याचा प्रयत्न करत आहे. 'मॅगझिन' या दोन जगांमधील भावनिक प्रवास मांडतो. चित्रपटाच्या पोस्टरवरून स्पष्ट होते की, हा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नसून स्वतःची ओळख आणि मुळांकडे पुन्हा पाहण्याचा आहे.

नव्या चेहऱ्यांची निवड

'मॅगझिन'चे दिग्दर्शन शुभम संजय शेवडे यांनी केले आहे. चित्रपटात नवोदित आणि दिग्गज कलाकारांचा मेळ पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक शुभम शेवडे याबद्दल सांगताना म्हणाले, 'मॅगझिन'च्या माध्यमातून आम्हाला एका प्रवासाची दोन टोके एकत्र आणायची होती. नवे चेहरे आणि अनुभवी कलाकारांचा अभिनय यात चित्रपटाचा आत्मा दडलेला आहे.

थिएटरमध्ये येण्यापूर्वीच 'मॅगझिन'ने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. बर्लीन, स्टुटगार्ट, सिडनी तसेच देशातील विशेष स्क्रीनिंगमध्ये चित्रपटाचे सादरीकरण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT