दिवंगत पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज यांचे आज निधन झाले. Instagram
मनोरंजन

दिवंगत पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज काळाच्या पडद्याआड

स्वालिया न. शिकलगार

पुढारा ऑनलाईन डेस्क - दिवंगत पंडित जसराज यांची पत्नी आणि चित्रपट निर्माते डॉ. व्ही. शांताराम यांची कन्या मधुरा पंडित जसराज यांचे निधन झाले. २५ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वयासंबंधी आजारपणाने त्यांचे निधन झाले. त्यांनी पती पंडित जसराज यांच्यासोबत अनेक डॉक्युमेंट्री आणि नाटकांचे दिग्दर्शन केलं होतं. सोबतचं त्यांनी आपल्या पतीची बायोग्राफी देखील लिहिली होती. मधुरा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ओशिवारा स्मशानभूमीत केलं जाईल.

मधुरा पंडित जसराज यांना दोन मुले दुर्गा जसराज आणी शारंग देव आहेत. त्यांची मुलगी दुर्गाने आईच्या निधनाची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की, मधुरा यांची तब्येत काही महिन्यांपासून खराब होती.

मधुरा जसरास पंडित यांनी लिहिली होती पुस्तके

मधुरा यांनी काही पुस्तके लिहिली होती. त्यामध्ये व्ही शांताराम : द मॅन हू चेंज्ड इंडियन सिनेमा आणि ५५० पानी मराठी चरित्र शांताराम देखील समाविष्ट आहे. नंतर त्या एक दिग्दर्शिकादेखील बनल्या. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट ‘आई तुझा आशीर्वाद’ यांचे दिग्दर्शन केले. वयाच्या ७३ व्या वर्षी दिग्दर्शिका म्हणून डेब्यू करणाऱ्या त्या पहिल्या दिग्दर्शिका झाल्या. हा चित्रपट २०१० मध्ये रिलीज झाला होता.

मधुरा आणि पंडित जसराज १९६२ मध्ये लग्नबंधनात अडकले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT