पुढारी ऑनलाईन डेस्क : धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने कारकिर्दीच्या शिखरावर असताना १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठ बाधली. यानंतर माधुरी ही पतीसोबत अमेरिकेत स्थायिक झाली. लग्नानंतर काही चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर माधुरीने बॉलीवूडमधून ब्रेक घेतला. माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांना दोन मुले झाली आहेत. यादरम्यान चाहत्यांना माधुरीची उणीव भासू लागली; पण त्यावेळी माधुरीने करिअरपेक्षा कुटुंबाला अधिक प्राधान्य दिले.
आता एका मुलाखतीत माधुरी म्हणाली, मला वाटते की, माझ्या आयुष्यात डॉ. श्रीराम नेने यांच्या रूपाने एक व्यक्ती भेटली ज्यांच्याशी मला लग्न करायचे होते. काम करत असताना स्वत: चीही अनेक स्वप्ने असतात, माझ्यासाठी माझे घर, पती, मुले, कुटुंबीय एकत्र माझ्यासोबत असणे महत्वाचे होते. मुंबईत परतणे हा निर्णय माझा कुटुंबासाठी खूपच सोयीचा आणि जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. माझे आई-वडील माझ्यासोबत राहत होते आणि त्यांचेही वयही वाढले होते. त्यांना आपल्या मायदेशात परतायचे होते, त्यामुळे आम्ही मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला.
आई-बाबांनी सांगितल्यावर मग आम्हालाही वाटले की, आता भारतात परतण्याची वेळ आली आहे. माझी मुले ही भारतातील संस्कृती आणि अनेक गोष्टी अनुभवू शकतात.