मनोरंजन

घराणेशाहीतला सत्तासंघर्ष टिपणारा ‘लोकशाही’ चित्रपट लवकरच

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : घराणेशाहीतला सत्तासंघर्ष नेमका मिळालेला लाभ की शास्वत शाप हा प्रश्न उपस्थित करणारा सुशीलकुमार अग्रवाल निर्मित 'लोकशाही' चित्रपट भेटीला येत आहे. 'अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड', 'लोकशाही' चित्रपट प्रस्तुत करत आहे. दरम्यान, लोकशाहीचे पोस्टर रिलीज झाले होते.

संबंधित बातम्या –

या पोस्टरमध्ये प्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशे विचारमग्न गंभीर अशा अवस्थेत असून समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले आणि मराठी सिनेसृष्टीत नावाजलेला अभिनेता अंकित मोहन हात जोडून लाखोंच्या संख्येत असणाऱ्या जनतेसमोर काहीतरी आव्हान करत असल्याचे दिसत आहे. नेमके हे आव्हान काय असणार आहे? आणि या आव्हानाला जनतेचा काय कौल असणार आहे?

चित्रपट संजय अमर यांनी दिग्दर्शित केला असून ९ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

SCROLL FOR NEXT