ठाणे : पुढारी ऑनलाईन
ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी ठाण्यातील त्यांच्या राहत्या घरी (दि. २ जुलै) दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून लीलाधर कांबळी कॅन्सरशी लढत होते.
चित्रपटांतील काम
आई पाहिजे, सारेच सज्जन, जिगर, बरखा सातारकर, सिंहासन, हल्लागुला, रंगत संगत, प्राण जाये पर शान न जाये, हंगामा, वनरुम किचन, सुकन्या, श्वास, सविता बानो या चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला होता. शॉर्टकट, दुभंग, राम तुझी सीता माऊली, लेकुरे उदंड यासारखी निवडक नाटकातून विविध पात्र साकारणारे लीलाधर हसवणूक, शॉर्टकट, दुभंग, राम तुझी सीता माऊली, लेकुरे उदंड, गंगुबाई नॉन मॅट्रीक यासारख्या मालिकांमधून काम केले.
हिमालयाची सावली, कस्तुरी मृग, प्रेमा तुझा रंग कसा, आमच्या या घरात, हसवाफसवी, वस्त्रहरण यासारख्या ३० नाटकांमधून त्यांनी अभिनय केला होता. भाकरी आणि फूल, कॉमेडी डॉट.कॉम, कथास्तु, चला बनू करोडपती, या मालिकांमधूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली.
विशेष म्हणजे 'वात्रट मेले' या नाटकातील त्यांची भूमिका गाजली. वस्त्रहरण या नाटकातील तसेच दिलीप प्रभावळकर यांच्या हसवाफसवी नाटकातील त्यांच्या भूमिका विशेष ठरल्या.